Protein Rich Breakfast  esakal
फूड

Protein Rich Breakfast : सकाळच्या नाश्त्याला बनवा केरळ स्टाइल डोसा, जाणून घ्या हेल्दी नाश्त्याची रेसिपी

आम्ही तुम्हाला अशी डिश सांगणार आहोत जी ग्लुटेन फ्री असण्याबरोबरच प्रोटीन रिच असेल

साक्षी राऊत

Protein Rich Breakfast : तुम्हाला साउथ इंडियन डिशेस खायला फार आवडत असेल तर आज आम्ही तुम्हाला अशी डिश सांगणार आहोत जी ग्लुटेन फ्री असण्याबरोबरच प्रोटीन रिच असेल. तुम्ही आतापर्यंत मसाला डोसा, पनीर डोसा, प्लेन डोसा अशा अनेक प्रकारचा डोसा खाल्ला असेल. मात्र तुम्ही केरळ स्टाइल अंड्याचा डोसा ट्राय केला आहे का? नसेल खाल्ला तर एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा.

अंडा डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

डोसा बॅटर

२ चमचे तेल

१ अंडा

बारीक कापलेला कांदा

१ चमचा बारीक कापलेली मिर्ची

१ मोठा चमचा कापलेली कोथिंबीर

१ छोटा चमचा मीठ

१ चमचा इडली पोडी (Recipe)

अंडा डोसा बनवण्याची पद्धत

अंडा डोसा बनवण्यासाठी सगळ्यात आधी डोस्याचा तवा हाया फ्लेमवर ठेवा. त्यानंतर फ्लेम कमी करून त्यावर थोडे पाण्याचे थेब शिंपडा आणि त्याला कापडाने पुसून घ्या. आता पॅनवर डोसा पसरवा. आता डोस्याच्या सगळ्या काठांनी तेल लावा. आता अंडा फोडून त्याला चांगले फेटून तो डोस्यावर पसरवा. (Food) आता कांदा, बारीक चिरलेली मिर्ची आणि कोथिंबीर त्यावर टाका. आता हळू हळू चमच्याच्या साहाय्याने दाबून त्यावर मीठ आणि इडली पोडी टाका.

आता जेव्हा डोसा चांगल्याप्रकारे सोनेरी रंगाचा होईल तेव्हा त्याला दुसऱ्या बाजूनेही पलटा. त्याला १-२ मिनिटे शिजू द्या. आता डोसा अजून एकदा पलटून घ्या. आणि अर्ध्यातून कापून घ्या. अशाप्रकारे तुमचा अंडा डोसा तयार आहे. तुम्ही हा डोसा चटणीसोबतही ट्राय करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात; सेन्सेक्स 150 अंकांनी घसरला; हे शेअर्स तोट्यात!

Shubman Gill Fitness Test: गिलच्या तंदुरुस्ती चाचणीवर लक्ष गुवाहाटी कसोटी : सहभागाची शक्यता कमी; साई सुदर्शनला संधी

शिक्षकांच्या रजेसाठी शाळेलाच सुट्टी ! 'ग्रामीण विद्यार्थ्यांचे नुकसान'; मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक प्रकार..

Gold Rate Today : देशभरात सोने आणि चांदी स्वस्त! तुमच्या शहरातील आजचा भाव जाणून घ्या

Nagpur: सावधान...मॉर्निंग वॉकला मिळू शकते बिबट्याची सोबत! नागपूरकरांमध्ये दहशतीचे वातावरण; सीमावर्ती भागात हव्या वनविभागाच्या चौकी

SCROLL FOR NEXT