फूड

घरीच तयार करा पंजाबी लोणचे; जाणून घ्या रेसिपी

काही पंजाबी रेसिपीज ज्या सोप्या पद्धतीने घरी बनवू शकता

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जर तुम्हाला विचारलं की स्वादिष्ट खाण्याच्या बाबतीत कोणते शहर उत्तम आहे, तर या लिस्टमध्ये पंजाबचे (panjab) नाव येतेच. पंजाबी हे असे राज्य आहे जे स्वादिष्ट भोजनासाठी ओळखले जाते. छोले भटूरे, मक्याची भाकरी, सरसो साग अशा अनेक पदार्थांसाठी पंजाबी डीश स्वादिष्ट मानले जाते. ज्याप्रकारे पंजाबी जेवण फेमस आहे. तसेच यातील एक पदार्थ म्हणजे पंजाबी आचार (लोणचे) (aachar) ही डीश संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. आम्ही तुम्हाला आज काही पंजाबी रेसिपीज (receipe) सांगणार आहोत. ज्या तुम्ही सोप्या (easy steps) पद्धतीने घरी बनवू शकता. त्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही. शिवाय याची चव उत्तम असते.

पंजाबी चिकण लोणचे -

कृती -

सुरुवातीला चिकनला साफ करून घ्या. आणि यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि लिंबाचा रस घालून एकत्र करा. एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि यामध्ये चिकनचे पीस मिक्स करून चार ते पाच मिनिटांसाठी फ्राय करून घ्या. यासोबत तुम्ही आलं लसूण पेस्ट घालून शकता. पॅनमध्ये तेल टाकून त्यात हळद, धने पावडर, मोहरी, सोप आणि मीठ घालून गरम करा. यामध्ये चिकन फ्राय करून घेऊन व्हिनेगर घालून थोड्यावेळासाठी शिजवून घ्या. साधारण पाच ते सहा मिनिटानंतर गॅस बंद करा आणि थंड झाल्यानंतर याला एका डब्यामध्ये ठेवून द्या. एक दोन दिवसानंतरही हे तुम्ही खाऊ शकता.

पंचाबी आंबा लोणचे -

कृती -

सुरुवातीला कढईमध्ये तेल गरम करून घ्या आणि त्याला एक भांड्यात काढून घ्या. त्यानंतर एका भांड्यात मेथीदाणे, कलोजी, हळद, मीठ, अर्धा कप गरम केलेलं तेल मिक्स करा. यानंतर आंब्याला छोट्या छोट्या तुकड्यात कापून घ्या. यासोबत काबुली, चना हे मिश्रण पॅनमध्ये घालून मिक्स करून घ्या. आता या मिश्रणाला एक ते दोन दिवसासाठी उन्हामध्ये वाळवायला ठेवा आणि यामध्ये सरसाचे तेल घालून एका पॅकबंद डब्यांमध्ये तुम्ही ठेवू शकता. तुमचे पंजाबी आंबा लोणचे तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या २५८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT