High Protein Egg Sandwich sakal
फूड

High Protein Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्याला बनवा 'हाय प्रोटीन एग सँडविच', लगेच नोट करा रेसिपी

Protein-Rich Sandwich Recipe for Busy Mornings: सकाळच्या नाश्त्यासाठी चविष्ट आणि पौष्टिक एग सँडविच नक्की ट्राय करा!

Anushka Tapshalkar

Quick and Easy Breakfast With Eggs: सकाळी नाश्त्याला रोज काहीतरी नवीन आणि चविष्ट खायला प्रत्येकालाच हवं असतं. अशावेळी नेहमीचे पोहे, उपीट किंवा इतर नाश्त्याचे पदार्थ खावेसे नाही वाटत. मग अशावेळी सगळ्यांनाच आवडेल असं आणि पौष्टिक काय बनवायचं हे सुचत नाही. त्यासाठीच पुढे दिलेली उकडलेल्या अंड्यांच्या सँडविचची रेसिपी नक्की ट्राय करा.

एग सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य

तेल किंवा तूप

उकडलेली अंडी

ब्रेड

बारीक चिरलेली शिमला मिरची

बारीक चिरलेला टोमॅटो

बारीक चिरलेला कांदा

बारीक चिरलेली कोथिंबीर

काळी मिरी पावडर

चिली फ्लेक्स

ओरेगॅनो

मीठ

मेयॉनीज

एग सँडविच बनवण्यासाठीची कृती

प्रथम एका भांड्यात उकडलेली अंडी खिसुन घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो घाला. नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर, चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो घाला. हे मिश्रण मिक्स व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यात मेयॉनीज घाला आणि हे सगळे मिश्रण एकत्रित करून सारण तयार करा. आता एका ब्रेडवर हे सारण नीट स्प्रेड करा. त्यावर दुसरा प्लेन ब्रेड ठेवा.

हे बाकी ब्रेडस सोबतही करून तुम्हाला हवे तेवढे सॅन्डविचेस तयार करा. आता एका पॅनमध्ये तूप किंवा तेल किंवा बटर तुमच्या आवडीनुसार गरम करा. तूप व्यवस्थित गरम झाले की तयार केलेले सॅन्डविच पॅनवर ग्रिल करायला ठेवा. हे सॅन्डविचेस दोन्ही बाजूने नीट ग्रील करून घ्या. तुमचे बॉईल्ड एग सॅन्डविच तयार आहे. तुम्ही हे गरमागरम सॅन्डविच केचअप किंवा पुदिना चटणी सोबत सर्व्ह करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झोपलेले गृहमंत्री जागे होतील अशी अपेक्षा, रोहित पवारांनी व्यक्त केला संताप; मध्यरात्री ३ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात

ENG vs IND: जो रुट भारतासाठी ठरलाय डोकेदुखी! ३९ वे कसोटी शतक ठोकत केलेत कोणालाच न जमलेले पराक्रम

Latest Marathi News Updates Live : भागलपूरमध्ये पिक-अप व्हॅनचा अपघात, पाच तरुण ठार

John Abraham: जॉन अब्राहम गुप्तहेराच्या वेगळ्या रूपात झळकणार; ‘तेहरान’ लवकरच ओटीटीवर

धक्कादायक! 'साेलापुरमध्ये तरुणाने व्हिडिओ पाठवून जीवन संपवले'; दोनच महिन्यापूर्वी विवाह, भलतचं कारण आलं समाेर..

SCROLL FOR NEXT