quick easy snacks paneer lollipop easy made recipe food  in marathi
quick easy snacks paneer lollipop easy made recipe food in marathi 
फूड

Quick Easy Snacks: पनीर टिक्का नाहीतर पार्टीमध्ये सर्व्ह करा पनीर लॉलीपॉप

अर्चना बनगे

कोल्हापूर: आपल्या घरामध्ये जेव्हा पार्टी असते त्यावेळेस प्रत्येक वेळेस कोणते स्नॅक्स असावे आणि त्यामध्ये काय वेगळेपण असावे असा नेहमी प्रश्न पडतो. असे खुप सारे मांसाहारी पदार्थ आहेत ज्याचा स्नॅक्स करता शाकाहारी मध्ये देखील वापर केला गेला आहे. जसे की चिकन लॉलीपॉप. हा पदार्थ लोकप्रिय आहे जो उत्तर भारतामध्ये याचे खूप खवय्ये शौकीन आहेत. शाकाहारी लोकांना लक्षात घेऊन खूप साऱ्या मांसाहारी पदार्थाचे शाहकारी पदार्थांमध्ये प्रकार बनवले गेले आहेत.  जे खूप सोप्या पद्धतीने तयार करता येतात. शाकाहारी लॉलीपॉप बनवण्यासाठी पनीरचा जास्त वापर करण्यात येतो. त्यामध्ये बटाटे आणि खूप सारे मसाल्याचे मिश्रण तयार करून पनीर लॉलीपॉप  खूप चांगल्या पद्धतीने  तयार करून पार्टी मध्ये एक वेगळीच रंगत आपण आणू शकतो.

पनीर लॉलीपॉप चे वैशिष्ट्य असे आहे की ते  खूप सोप्या पद्धतीने बनवता येते. आणि  हिरव्या चटणीबरोबर आपण खाऊ शकतो. एकदम अचानक आपल्या घरी पाहुणे आले आणि अशा वेळेस काय बनवावा असा जर प्रश्न पडला असेल स्नॅक्स म्हणून शाकाहारी मध्ये आपण पनीर लॉलीपॉप बनवू शकतो. यासाठी या भागामध्ये आपण जाणून घेऊया  पनीर लॉलीपॉप कसे बनवले जाता..

पनीर लॉलीपॉप पाककृती- 
१) एक  कप पनीर
२) उकडलेले बटाटे दोन
३) हिरवी मिरच्या दोन 
४) अर्धा कप शिमला मिरचीचे तुकडे 
५)  एक टीस्पून आले
६) एक टिस्पून लसूण
७) अर्धा टीस्पून जिरे पावडर
८) अर्धा टी स्पून गरम मसाला पावडर
९) पाव चमचा कोथंबीर
१०) चवीनुसार मीठ
११) स्वादानुसार लाल मिरची पावडर
११) 1 कप ब्रेड क्रम्स
१२) अर्धा कप मैदा

बनवण्याची पद्धत:
-पनीर आणि उकडलेल्या बटाट्यांना एका बाऊलमध्ये कुस्करून घ्या
-शिमला मिरची आणि सगळे मसाले एकत्र घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे
-त्या मिश्रणापासून छोटे छोटे गोल गोळे करून बाजूला ठेवून द्यावे
-मैद्यामध्ये थोडेथोडे पाणी घालून मिश्रण एकसारखे बनवून घ्या
- पनीरच्या गोळ्यांना मैद्याच्या मिश्रणामध्ये बुडवून ब्रेडक्रम्स मध्ये टाकुन रोल करा
-या गोळ्यांना ब्राऊन कलर येईपर्यंत तेलामध्ये चांगले तळुन घ्या. आता त्या गोळ्यांना टूथपिक लावा आणि चटणी आणि सॉस बरोबर सर्व्ह करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अभिषेक पोरेलचे आक्रमक अर्धशतक, दिल्लीच्या 120 धावा पार

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT