quick morning breakfast how to make rava uttapam  
फूड

Rava Uttapam Recipe: नाश्त्यासाठी झटपट बनवा रवा उत्तापा, जाणून घ्या रेसिपी

बहुतांश लोकांना दक्षिण भारतीय पदार्थ खायला आवडतात. त्यामध्ये अनेक प्रकार आहेत. इडली, डोसा, उत्तपा. यामध्येसुद्धा अनेक प्रकार आपण चाखले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. शरीरासाठी पोषक आहार जितका महत्त्वाचा आहे, तितकेच अन्नपदार्थांचे वेळेवर सेवन करणेही महत्त्वाचे आहे. पण अनेकदा ऑफिसच्या धावपळीत आपण नाश्ता करायचं टाळतो. प्रत्येक गृहिणीची सकाळी खुप धावपळ सुरु असते. मुलांचा डबा, घरातल्या इतर मंडळींचा डबा यासर्वात नाश्ता तयार करण्यासाठी कोणाकडेही जास्त वेळ नसतो. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला एक खास रेसिपी सांगणार आहोत. जी कमी वेळेत पटकन बोलते.

बहुतांश लोकांना दक्षिण भारतीय पदार्थ खायला आवडतात. त्यामध्ये अनेक प्रकार आहेत. इडली, डोसा, उत्तपा. यामध्येसुद्धा अनेक प्रकार आपण चाखले आहेत. पण सर्वात कमी वेळेत तयार होणार उत्तापा म्हणजे रवा उत्तापा. रवा उत्तपा तयार करणे खूप सोपे आहे. याला फार वेळ लागत नाही. तर चला जाणून घेऊया रवा उत्तपा बनवण्याची सोपी पद्धत.

साहित्य

रवा - १ कप

टोमॅटो चिरून - ३-४ चमचे

चिरलेला कांदा - २-३ चमचे

चिरलेली हिरवी मिरची - २ टीस्पून

हिरवी कोथिंबीर चिरलेली – ३ चमचे

दही - १/४ कप

तेल - आवश्यकतेनुसार

मीठ - चवीनुसार

कृती

प्रथम रवा एका भांड्यात दही घालून भिजत ठेवा. रवा भिजेपर्यंत तुम्ही टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घ्या. यानंतर हिरवी मिरची आणि हिरवी कोथिंबीरही चिरून घ्या. दह्यामध्ये रवा भिजायला 20 मिनिट पुरेसे आहेत. रवा भिजल्यानंतर त्यामध्ये 1 कप पाणी घासा. त्यानंतर चिरलेले सर्व पदार्थ आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण तयार करा.

त्यानंतर गॅसवर पॅन ठेवा. पॅन चांगला तापल्यानंतर त्यावर हे एकजीव झालेलं मिश्रण पसरवा. यानंतर उत्तापा चांगला शिजू द्या. दोन्ही बाजून चांगला भाजून घ्या. सोनेरी होईपर्यंत शिजवा. मग तयार झाला तुमचा रवा उत्तापा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT