Weight Loss Breakfast esakal
फूड

Weight Loss Breakfast : वेट लॉस डाएटसाठी एकदम परफेक्ट नाश्ता, लगेच नोट करा रेसिपी

जर तुम्हाला रोज साऊथ इंडियन नाश्ता खाण्याचा कंटाळा आला असेल तर बनवा चविष्ट कोथिंबीर आणि बेसन वडी

साक्षी राऊत

Weight Loss Breakfast : रात्री झोपल्यानंतर अगदी ६-८ तासांच्या गॅपमुळे सकाळी लवकर भूक लागते. अशात सकाळचा हेल्दी नाश्ता आरोग्यासाठी फायद्याचा ठरतो. लोकांना नाश्त्यासाठी अनेकदा चवदार आणि आरोग्यदायी पदार्थ हवे असतात. विशेषत: न तळलेले, त्यामुळे वजन कमी करण्याबरोबरच पोषणही मिळते.

जर तुम्हाला रोज साऊथ इंडियन नाश्ता खाण्याचा कंटाळा आला असेल तर बनवा चविष्ट कोथिंबीर आणि बेसन वडी. ज्याची चवही अप्रतिम आहे शिवाय खाण्यासही पौष्टिक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा पदार्थ ग्लूटेन मुक्त आहे. जे वजन कमी करण्यासाठी मदत करते.

कोथिंबीर बेसन वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

कोथिंबीर 150 ग्रॅम

100 ग्रॅम बेसन

3 लसूण पाकळ्या

लाल मिरची किंवा हिरवी मिरची

हिंग 2 चिमूटभर

1 टीस्पून अजवाईन

चवीनुसार मीठ

मोहरी दोन चमचे

पांढरा तीळ अर्धा टीस्पून

दही 30 ग्रॅम

तेल

वडी बनवण्याचे साहित्य

सर्व प्रथम कोथिंबीर नीट धुवून चिरून घ्यावी. नंतर एका मोठ्या भांड्यात कोथिंबीर सोबत बेसन घ्या. त्यात दही, लाल तिखट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला लसूण मिक्स करा. कोशिंबीरही त्यातच घाला. हिंग आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.आता चपातीप्रमाणे लाटून त्याचा रोल करा. त्यानंतर त्याचे लहान लहान काप करा. (Recipe)

आता वड्या वाफवून घ्या

तयार मिश्रण हातात घेऊन लहान अंडाकृती आकार करून इडलीच्या साच्यात वाफवून घ्या. या शिजलेल्या वड्या काढा आणि त्यांचे तुकडे करा. आता कढईत तेल टाकून मोहरी तडतडून घ्या. सोबत पांढरे तीळ टाका आणि वडीचे तुकडे घातल्यावर चांगले मिक्स करा. चविष्ट आणि पौष्टिक नाश्ता तयार आहे. संध्याकाळचा नाश्ता म्हणूनही तुम्ही ही वडी खाऊ शकता. (Food)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT