Mahashivratri 2024  esakal
फूड

Mahashivratri 2024 : राजगिऱ्याचे लाडू अन् भगर तर खाल्ली असेलच; उपवासाचा कढी-भात कधी ट्राय केलाय का?

ही रेसिपी ट्राय केली आहे का? बनवायला खूप सोपी, चविष्ट आणि पोट भरेल अशी ही रेसिपी आहे..

सकाळ डिजिटल टीम

Mahashivratri Food Recipe 2024 : महादेवाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे महाशिवरात्री. महाशिवरात्रीला हिंदू धर्मात खूप महत्त्व दिले जाते आणि या दिवशी महादेवाचे भक्त उपवास आणि पूजा करून महादेवाला प्रसन्न करतात. भगवान शिव आपल्या भक्तांचे प्रत्येक संकटापासून रक्षण करतात आणि त्यांची पूजा केल्याने अकाली मृत्यूचे भय नाहीसे होते. 

तुमचाही आज उपवास असेल ना? अन् नेहमी प्रमाणे या उपवासासाठी तुम्ही राजगिऱ्याचे लाडू, फळे, भगर अशा गोष्टी आणल्या असतील. पण तुम्ही कधी याच पारंपरिक पदार्थांची कढी भात ही रेसिपी ट्राय केली आहे का? बनवायला खूप सोपी, चविष्ट आणि पोट भरेल अशी ही रेसिपी आहे.. त्यामुळे नक्की ट्राय करा.

भगरीचा भात

साहित्य :

  • १ कप भगर

  • २ कप पाणी

  • १/२ टीस्पून मीठ

  • १ टीस्पून तूप

कृती :

  • भगर स्वच्छ निवडून पाण्याने धुवून घ्या. एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा आणि त्यात भगर घाला.

  • आता त्यात थोडे तूप आणि चवीनुसार मीठ घाला.

  • पाणी अर्धे कमी झाले की झाकण ठेवून पाणी पूर्णपणे आटेपर्यंत शिजवा आणि गॅस बंद करा.

राजगिरा कढी

साहित्य:

  • १/४ कप राजगिरा पीठ

  • १ कप ताजे दही

  • १ टीस्पून जिरे

  • १-२ हिरव्या मिरच्या

  • २ चमचे तूप

  • २ टेबलस्पून ताजी कोथिंबीर

  • आवश्यकतेनुसार पाणी

  • मीठ चवीनुसार

कृती :

  • एका वाडग्यात राजगिरा पीठ, दही आणि मीठ घाला आणि गुठळ्या असतील तर ते काढून टाकण्यासाठी नीट फेटा. पाणी घालून मिश्रण पाणीदार होईपर्यंत पातळ करा.

  • कढईत तूप गरम करून त्यात हिरव्या मिरच्या घाला, मिरची थोडी तडतडू द्या. आता त्यात हे मिश्रण टाका आणि छान मिक्स करा.

  • हे मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत उकळू द्या. याला ७-८ मिनिटं लागतील, आता गरमागरम राजगिरा कढी आणि भागरीचा भात ताजी कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT