Panjiri Recipe sakal
फूड

Panjiri Recipe : रामनवमीच्या प्रसादासाठी कशी बनवायची पंजिरी?

विशेष म्हणजे रामनवमीच्या दिवशी पंजिरी केली जाते.

सकाळ डिजिटल टीम

Panjiri Recipe : भगवान श्रीराम यांचा जन्मदिवस रामनवमी मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जातो. रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची पुजा केली जाते. रामाला प्रसाद म्हणून भोग अर्पण केला जातो. विशेष म्हणजे रामनवमीच्या दिवशी पंजिरी केली जाते.

धनिया पंजीरी ही खायला खुप स्वादिष्ट असते सोबत आरोग्यास फायदेशीर असते. त्यादिवशी भगवान रामासाठी प्रसाद म्हणून या पंजिरीचे खूप महत्त्व आहे. रामनवमीच्या दिवशी तुम्हालाही पंजिरीचा प्रसाद करायचा असेल तर ही रेसिपी जाणून घ्या

धने पावडर – 100 ग्राम
देसी तुप – 3 टी स्पून
साखर पावडर – 1/2 कप
कद्दूकस केलेलं नारळ – 1/2 कप
मखाने कापलेले – 1/2 कप
काजू – 8-10
बदाम – 8-10
चिरंजीचे दाणे – 1 टी स्पून

कृती

  • पंजिरी बनवायची असेल तर सर्वात आधी कढई घ्या

  • त्यामध्ये एक टी स्पून तुप टाका आणि मिडीयम आचेवर गरम करा.

  • जेव्हा तुप वितळेल तेव्हा कढईमध्ये धने पावडर टाका आणि गॅस कमी आचेवर ठेवा.

  • 1-2 मिनिट धने पावडर भाजा. त्यानंतर हे भाजलेले धने पावडर वेगळे काढा.

  • त्यानंतर पुन्हा तुप टाका आणि त्यात मखाने टाका आणि मध्यम आचेवर भाजा.

  • जेव्हा मखाने चांगल्याने भाजा आणि त्याला बेलनाने बारीक करा. यानंतर काजू, बदाम कट करुन टाका.

  • एक बाउल घ्या त्यामध्ये धनिया पावडर, बारीक केलेला मखाना, ड्राय फ्रूट्स (काजू आणि बदाम) टाकून मिक्स करा.

  • यानंतर मिश्रणामध्ये बारीक किसलेलं नारळ टाका आणि मिक्स करा. शेवटी त्यात चिरंजीचे दाणे त्यात टाका

  • तुमचा पंजिरीचा प्रसाद तयार झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS : ‘भारत-मेक्सिको भावंडांसारखे!’ मेक्सिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं दोन्ही संस्कृतीमधील साम्य

Amazon Investment: Amazon ची भारतात 48 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा! कंपनीच्या सीईओंची पंतप्रधानांशी चर्चा; रोजगारही वाढणार

'आयुष्यात प्रेम आणि रोमॅन्सची कमी...' घटस्फोटानंतर ईशा देओल पडली एकटी, म्हणाली...'माझे बॉयफ्रेंड्स होते पण...'

Mumbai News: बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ८४७ झाडांवर कुऱ्हाड, महाट्रान्सकोच्या याचिकेनंतर हायकोर्टाकडून कानउघाडणी

Latest Marathi News Live Update : राजकारणात प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार - मंत्री उदय सामंत

SCROLL FOR NEXT