breakfast esakal
फूड

नाश्ता, जेवणाची योग्य वेळ कोणती? आयुर्वेद काय सांगते जाणून घ्या!

आयुर्वेदात जेवण आणि झोपण्याच्या योग्य वेळेबाबत सांगितले आहे

सकाळ डिजिटल टीम

जगभरातल्या लोकांचे पुन्हा आयुर्वेद, हर्बल आणि ऑर्गेनिक उत्पादनांकडे लक्ष वाढते आहे. अनेक लोक केमिकलयुक्त पदार्थांपासून दूर राहत आहेत. आयुर्वेदात जेवण (Food) आणि झोपण्याच्या (Sleep) योग्य वेळेबाबत सांगितले आहे. खाण्या-पिण्याच्या योग्य वेळेचा शरीरावर महत्वाचा परिणाम होत असतो. चुकीच्या वेळी सकाळचा (Morning) नाश्ता केल्याने तसेच जेवल्याने मिळणारे पौष्टिक घटक हे शरीरासाठी (Body) नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे वात, पित्त आणि कफावर परिणाम होऊन त्यांचे संतुलन बिघडल्याने तुम्ही आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. आर्युवेदानुसार नाश्ता, जेवणाची योग्य वेळ जाणून त्याप्रमाणे खाण्याचा प्रयत्न केल्यास तुमच्या शरीरासाठी त्याचा नक्कीच फायदा होईल.

breakfast

नाश्त्याची योग्य वेळ ही हवी

आयुर्वेदानुसार (Ayurveda) सकाळी ७ ते ८ दरम्यानची वेळ नाश्त्यासाठी अतिशय योग्य असते. उठल्यानंतर लगेच एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्या. त्यानंतर फ्रेश व्हा. असे केल्याने तुमचे पोट साफ होईल तसेच चेहऱ्याची चमक वाढेल. सकाळी उठल्यानंतर अर्ध्या तासाने काहीतरी खाल्ले पाहिजे. जास्त वेळ न खाल्याशिवाय राहिलात तर तुम्हाला गॅसेस होऊ शकतात.

food

नाश्ता आणि जेवणादरम्यान किती अंतर हवे?

दुपारी १२ ते २.३० दरम्यान जेवावे. सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण यादरम्यान ४ तासांचे अंतर हवे. सूर्यास्तानंतर अन्न खाऊ नये, कारण त्यामुळे पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो.

Dinner

रात्री ९ नंतर जेवू नका

संध्याकाळी ६ ते ८ दरम्यान रात्रीचे जेवण जेवावे. आयुर्वेदानुसार झोपण्याआधी तीन तास तुम्ही जेवले पाहिजे. त्यामुळे शरीरात जेवण चांगले पचते. तसेच रात्री ९ नंतर जेवल्याने अपचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

VIDEO : अरे जरा तरी लाज बाळगा! चालत्या बाईकवर कपलचा धक्कादायक रोमान्स; बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसून तरुणीचे अश्लील चाळे

Latest Marathi News Updates : जम्मू-पठाणकोट महामार्गाजवळील सहर खड नदीवरील खचला

Gokul Dudh Kolhapur : गोकुळच्या बैठकीत सभासदांनी दोनचं प्रश्न विचारले, अन् संचालकांना बोलायला काही उरलचं नाही; नेमकं काय घडलं...

Raj Thackeray : मतदारयाद्यांवर काम करा; राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांना सूचना

SCROLL FOR NEXT