benefits of eating Guava  
फूड

हिवाळ्यात पेरू खाताय? पाच परिणाम वाचाच

हिवाळ्यात पेरू अतिशय चविष्ट मिळतात

सकाळ डिजिटल टीम

हिवाळ्यात पेरू अतिशय चविष्ट मिळतात. पेरूमध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट, पोटॅशियम आणि फायबर, तसेच व्हिटॅमिन सी भरपूर असते. दररोज पेरू खाल्ल्यामुळे(Food) रक्तातील साखरेची पातळी(Blood Suger Level), हृदयाचे आरोग्य, पचनसंस्था आणि वजन कमी करण्यासाठी फायदा होतो.पेरू खाण्यामुळे होणारे परिणाम जाणून घेणे महत्वाचे आहे.

पेरू खाण्याचे फायदे

१) तज्ज्ञांच्या मते, पेरूमध्ये संत्र्यापेक्षा 4 पट जास्त व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करते. त्यामुळे रोगांपासून शरीराचे संरक्षण करते.

२)पेरू शरीरातील सोडियम - पोटॅशियमचे संतुलन सुधारण्यास मदत करतात. म्हणूनच रक्तदाब आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.तसेच पेरू ट्रायग्लिसराइड्स आणि कोलेस्टेरॉल (LDL) चा स्तर कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे हृदयरोग टाळण्यास मदत मिळते.

३) प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात पेरूत असतात. साखरेचे प्रमाण कमी असते तसेच मुबलक तांबे असल्यामुळे वजन नियंत्रणात येण्यासाठी पेरू खाल्ल्याने फायदा होतो. थायरॉईड, चयापचय नियंत्रित करण्यासाठी तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी पेरू फायदेशीर आहे.

४) पेरू , त्याची पाने व्हिटॅमिन सी आणि लोहाचा उत्तम स्रोत आहेत. सर्दी, खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी पेरू प्रभावी ठरतो. सर्दी- खोकल्यादरम्यान जास्त पिकलेले पेरू खाणे टाळावे, असे तज्ज्ञ सांगतात. पण, कच्चा पेरू श्लेष्माची निर्मिती कमी करण्यासाठी चांगला आहे.

५) पेरू हे लाइकोपीन, क्वेर्सेटिन आणि पॉलीफेनॉल सारख्या अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहेत. ते कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करण्यास मदत करतात. पेरूच्या पानांच्या तेलामध्ये प्रजननविरोधी घटक असतात जे कर्करोगाचा प्रसार रोखण्यासाठी मदत करतात असेही आढळले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT