the recipe of aloo bonda for readers in kolhapur 
फूड

सांयकाळच्या चहाची चव वाढवायची आहे ? मग हा झटपट होणार पदार्थ नक्की ट्राय करा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :

मुख्य साहित्य -

2 कप बेसन पीठ, 3 चमचे तांदळाचे पीठ, चवीनुसार मीठ, 1 छोटी चमचा राई, 7 हिरव्या मिरची, कापलेली कोंथबीर, 4 - उकडलेले बटाटे, हळद, एक कप पाणी, हिंग, तळण्यासाठी तेल आणि गरजेनुसार एक लिंबु

 कृती - 

एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे योग्यप्रकारे मॅश करून बाजुला काढून ठेवा. दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करुन घ्या. तेल गरम झाल्यावर त्यात हिंग, मोहरी, मिरची आणि मीठाचा तडका देवून दोन मिनीट ते गरम करुन घ्या.

आता त्या पॅन मध्ये मॅश केलेले बटाटे घाला. आणि वरून हळद पावडर आणि कोथंबीर टाका. आता या मिश्रणात एक चुटकी मीठ घालून त्याला एकजीव करा आणि या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करा त्यांना वड्या प्रमाणे आकार द्या. आता एक वेगळा बाउल घेऊन त्यात बेसन पीठ तांदळाचे पीठ घ्या. त्यात एक चिमट हळद आणि लाल तिखट टाका. आणि यात वरून पाणी घालून ते एकजीव करून घ्या. लक्षात घ्या ते मिश्रण तयार करत असताना त्यात गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्या. 
वरून दोन चमचे गरम तेल घालून त्याला परत एकजीव करा.
तेलामुळे वडा खुसखुशीत बनेल. 

आता एका वेगळ्या कढईत तेल गरम करून घ्या. वडा पूर्ण बुडून राहील इतके तेल घ्या. बेसनाच्या पिठात वडा टाका, आणि त्याला पुर्णपणे ते पीठ लागू द्या. आता हा वाडा तेलात तळण्यासाठी सोडा. जोपर्यंत त्याला तांबूस कलर येत नाही. तोपर्यंत तळा. नंतर हे वडे तुम्ही चटणी किंवा सॉस बरोबर खाऊ शकता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT