Poha Cheela  sakal
फूड

Poha Cheela Recipe: पोहे पासून बनवा एक वेगळ्या प्रकारचा नाश्ता फक्त 5 मिनिटांत...

नाश्त्यासाठी बनवा पोहे चिला, दिवसभर राहाल एनर्जीने भरून!

Aishwarya Musale

खवय्यांना नेहमीच काही ना काही तर वेगळ खाण्याची इच्छा होत असते. सकाळी उठल्यानंतर काहीतरी मस्त नाश्ता असावा असं प्रत्येकाला वाटत असतं. इडली, डोसा, सांभार याव्यतिरिक्त अनेक साऊथ इंडियन पदार्थां नेहमी आपण आस्वाद घेत असतो.

पण इडली किंवा डोसा बनवायचा म्हणजे पीठ दळा, आंबवा अशी तयारी आधीच करावी लागते. पण तुम्ही कधी पोहा चिला ट्राय केला आहे का? तर पोह्यांपासून अगदी कमीत कमी पोहा चिला बनवण्याची रेसेपी घ्या जाणून...

पोहे चिला बनवण्यासाठी आवश्यक साहित्य-

  • पोहे १ वाटी

  • बेसन 1/3 कप

  • ओट्स पावडर 1/3

  • गाजर 1 टीस्पून किसलेले

  • कांदा १ टीस्पून बारीक चिरून

  • टोमॅटो 1 टीस्पून बारीक चिरून

  • हिरवी धणे १ टीस्पून बारीक चिरून

  • हिरवी मिरची १ चिरलेली

  • हळद पावडर 1 टीस्पून

  • लाल मिरची पावडर 1 टीस्पून

  • धने पावडर 1 टीस्पून

  • चवीनुसार मीठ

  • तळण्यासाठी देशी तूप

पोहे चिला कसा बनवायचा?

पोहे चिला बनवण्यासाठी प्रथम पोहे चांगले धुवून घ्यावेत.

मग तुम्ही पाणी काढून टाका आणि सुमारे 10 मिनिटे असेच ठेवा.

यानंतर पोहे चांगले मॅश करा.

नंतर बेसन आणि ओट्स पावडर घालून मिक्स करा.

यानंतर त्यात गाजर, कांदे, टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घाला.

नंतर त्यात हळद, तिखट, धने पावडर आणि मीठ घालून मिक्स करा.

यानंतर त्यात अर्धा कप पाणी घालून पीठ तयार करा.

नंतर नॉनस्टिक पॅनला एक चमचा तुपाने ग्रीस करा.

यानंतर तव्यावर दोन-तीन चमचे पोह्याचे मिश्रण ठेवा.

नंतर मिश्रण तव्यावर गोलाकार आकारात पसरवून चीला बनवा.

यानंतर, दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत फ्राय करा.

आता तुमचा गरमागरम पोहे चीला तयार आहे.

नंतर तुमच्या आवडत्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

Suspicious Truck Driver Death: ठाणाजवळ ट्रक चालकाचा संशयास्पद मृत्यू; गळफास, जखमा व रक्ताचे डाग पाहता घातपाताची शक्यता

Pune Bakri Eid : बकरी ईदसाठी पुण्यात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त; संवेदनशील भागात कडक सुरक्षा व्यवस्था

SCROLL FOR NEXT