Republic Day Special Recipe esakal
फूड

Republic Day Special Recipe : खास प्रजासत्ताकदिनी नाश्त्याला बनवा तिरंगा पोहे

पोहे तर आपण एरवी पण खातो. पण तिरंगा पोहे कसे बनवावे याची रेसिपी बघूया.

सकाळ डिजिटल टीम

Republic Day Special Recipe 2023 : आपला राष्ट्रीय सण असणारा प्रजासत्ताक दिन हा संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा होतो. बहुतेक सगळ्यांनाच या दिवसाची सुट्टी असते. अशावेळी जर तुम्हाला मुलांसाठी काही स्पेशल नाश्ता बनवण्याची इच्छा असेल तर एक खास तिरंगा रेसिपी आम्ही घेऊन आलो आहोत.

ही तिरंगा पोहे रेसिपी अगदी हेल्दी, टेस्टी आणि डोळ्यांनाही टेम्पटींग अशी आहे. बघुनच मुलांना खाण्याची इच्छा होईल आणि त्यांच्या तब्येतीसाठी उपयुक्त असे आहे. जाणून घ्या.

साहित्य

  • पोहे - अर्धा किलो

  • तेल

  • हिरव्या मिरच्या

  • पालक प्युरी

  • मीठ

  • लाल तिखट

  • टोमॅटो प्युरी

  • जिरे, मोहरी

  • चिरलेला कांदा

कृती

नारंगी पोहे कृती

पोहे भिजवून घ्या. कढईत तेल गरम झाल्यावर त्यात जिरे मोहरीची फोडणी घाला. त्यात कांदा नीट शिजवून घेत मग हळद, लाल तिखट, टोमॅटो प्युरी घाला. नीट परतून घेतल्यावर त्यात पोहे, मीठ घाला. सर्व फोडणी आणि पोहे व्यावस्थित मिक्स करून घ्या. त्याला छान नारंगी रंग येईल.

हिरवे पोहे कृती

कढईत तेल तापल्यावर त्यात जिरे मोहरीची फोडणी घालून कांदा नीट शिजवून घेत मग हळद, हिरवी मिरची, भिजवलेले पोहे आणि मीठ घालून नीट हलवून घ्या. मग नंतर त्यात पालक प्युरी घाला. याला थोड्यावेळ वाफ काढा.

पांढरे पोहे

कढईत तेल गरम करून त्यात जिरे मोहरीची फोडणी घाला. त्यात थोडं मीठ घाला आणि भीजवलेले पोहे टाकून परतून घ्या.

मांडणी

आता यासाठी तिरंग्याचा आकार तुम्हाला कसा बनवायचा त्यानुसार पोहे अरेंज करता येतात. यात जर गोलाकार मूद पाडल्यासारखा तिरंगा बनवायचा असेल तर एका मोठ्या बाऊल मध्ये सगळ्यात खाली नारंगी पोहे, त्यावर पांढरे आणि मग हिरवे पोहे घाला. म्हणजे मूद पाडल्यावर बरोबर नारंगी, पांढरा आणि हिरवा असा क्रम दिसेल.

किंवा जर ताटलीत आडवा तिरंगा बनवायचा असेल तर आधी नारंगी लेयर, मग पांढरा आणि नंतर हिरवा लेयर देऊन तिरंगा बनला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT