Dussehra 2024 Foods and Recipes:  Sakal
फूड

Dussehra 2024: दसऱ्याला मलाईदार स्वादिष्ट खीर बनवायची असेल तर नोट करा सोपी रेसिपी, सर्वजण खातच राहतील

Dussehra 2024 Foods and Recipes: देशभरात आज विजयादशमी साजरी केली जात आहे. या खास दिवशी खीर बनवण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या बनवण्याची सोपी रेसिपी काय आहे.

Puja Bonkile

Dussehra 2024 Foods and Recipes: हिंदू धर्मात दसऱ्याला खुप महत्व आहे. देशभरात मोठ्या आनंदात दसरा साजरा केला जातो. दसऱ्यालाच विजयादशमी म्हटले जाते. यंदा 12 ऑक्टोबरला म्हणजेच आज दसरा साजरा केला जात आहे. मान्यतेनुसार या दिवशी प्रभू श्रीरामांंनी लंकेचा राजा रावणाचा वध केला होता. तसेच तसेच दुर्गा देवीने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यानुसार वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतिक असलेला दसरा हा सण देशभरात मोठ्या आनंदात साजरा केला जातो. दसऱ्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी मलाईदार खीर बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया खीर बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य

तूप

सुकामेवा

1/2 वाटी भिजवलेले तांदूळ

1 लिटर दूध

वेलची पावडर

केशर दूध

1/2 वाटी साखर

किसलेले नारळ

खीर बनवण्यासाठी कृती

खीर बनवण्यासाठी सर्वात आधी सुकामेवा तुपात भाजून घ्यावा.

नंतर तांदूळ स्वच्छ धुवावे आणि तुपात सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यावे.

नंतर दूध उकळ्यानंतर त्यात १ चमचा वेलची पावडर टाका

नंतर केशर दूध मिक्स करून चमच्याने ढवळा.

नंतर वाटीभर साखर मिक्स करा आणि मंद आचेवर उकळू द्या.

खीरवर साय दिसू लागली की सुकामेका मिक्स करावे.

तुमची गरमागरम तांदळाची खीर तयार आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

Ryan Rickeltonने इतिहास रचला! जयसूर्या, तेंडुलकर यांचा विक्रम मोडला; जगात असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला...

SCROLL FOR NEXT