Rupesh Khandare writes about taste of bhakari and thecha Parshivni Ghogra Mahadev Temple sakal
फूड

भाकरी, ठेच्याची चव ‘लय भारी’

भाकरी व‌ ठेच्याची मागणी व प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत असल्याने नागपूरसह विदर्भातील पर्यटक पारशिवनी घोगरा महादेव देवस्थान तिर्थक्षेत्र येथे हजारोच्या संख्येने येत आहेत.

रुपेश खंडारे

पारशिवनी : तालुक्यातील घोगरा महादेव देवस्थान तिर्थक्षेत्र असून महाशिवरात्रीला यात्रेनिमित्त गर्दी होत असते. परंतु सद्या हिवाळा हा आल्हाददायक ऋतू असल्यामुळे प्रत्येक शनिवारी, रविवारी यास्थळी लहानापासून ‌तर

मोठ्यांपर्यंत पर्यटना‌करिता हजारोच्या संख्येत पर्यटक पेच नदी पात्रातील निसर्ग सौंदर्य आस्वाद, मौज-मज्जा करण्यासाठी येत असतात. पर्यटकांची गर्दी पाहता स्थानिक महिला बेरोजागारांनी पर्यटकांसाठी चुलीवरच्या ज्वारीची भाकरी आणि मिरचीच्या ठेच्याची चांगलीच भुरळ घातली आहे.

भाकरी व‌ ठेच्याची मागणी व प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत असल्याने नागपूरसह विदर्भातील पर्यटक पारशिवनी घोगरा महादेव देवस्थान तिर्थक्षेत्र येथे हजारोच्या संख्येने येत आहेत. एक प्रकारची शनिवारी, रविवारी येथे यात्रा भरत आहे.

त्यामुळे बेरोजगार महिला युवकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगाराची मोठी संधी भाकरी व ठेच्याच्या प्रसिद्धीने मिळत आहे. आज ३० ते ४० महिला पेंच नदी पात्रातील घोगरा महादेव देवस्थान तिर्थक्षेत्र येथे भाकरी व‌ ठेच्याचे दुकान लावून रोजगार मिळवून परिवाराचे पालनपोषण करित आहेत.

येथील ज्वारीच्या भाकरी चुलीवर शिजवून सोबत हिरवी मिरची, कांदा, सांबार, मीठ, कच्ची चटणी बनवून ३० ते ४० रुपयांत गावखेडयातील गरमागरम गावरान पोटभर जेवण पर्यटकांसाठी मेजवानी ठरत आहे. श्रीमंतातील श्रीमंत, धनाढ्य, मध्यम, गरीब, युवक-युवती, लहान-मोठे आवडीने ज्वारीची भाकरी व‌ ठेचा खाऊन तृप्त होत आहेत.

तृप्तीची ढेकर

या भाकरी व ठेच्याला अल्पकाळात प्रसिद्धी मिळाली असून पर्यटक मोठ्या आवडीने यास्थळी पर्यटनासाठी येत आहेत. ज्वारीची भाकरी व ठेच्याचा आस्वाद घेऊन मटणापेक्षा भाकरीची चव ‘लय भारी’ असे म्हणत तृप्तीची ढेकर देत गावाकडे परतत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पुणेकरांची दिवाळी यंदा धूमधडाक्यात! फटाक्यांची दुकानं राहणार २४ तास खुली

Arya Chavan: आर्या चव्हाणच्या मारकऱ्याला फाशीच द्या! 'सातारा सकल मराठा क्रांती मोर्चासह ग्रामस्‍थ आक्रमक'; खटला जलदगती न्‍यायालयात चालवा

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतून ठरणार रोहित-विराटचं भवितव्य? माजी प्रशिक्षकाच्या विधानानं खळबळ...

Quick Breakfast Idea: प्रोटिनने भरपूर, चवीला मस्त! सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा खुसखुशीत बटर गार्लिक पनीर

मोठी बातमी! दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची ग्वाही, पण ३३ पैकी ५ जिल्ह्यांचेच पंचनामा अहवाल अंतिम; शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज, पण...

SCROLL FOR NEXT