samosa ban in one city  esakal
फूड

Samosa Ban : या देशात आहे समोसा खाण्यावर बंदी! कारण काय ते वाचा

भारतीय लोकांना समोसा अत्यंत आवडतो.

सकाळ डिजिटल टीम

भारतीय लोकांना समोसा अत्यंत आवडतो. पाहुणे आले की अनेक घरांत आवर्जून त्यांना समोसा खायला (Food) दिला जातो. भारतात खूपच कमी लोकं असतील ज्यांना समोसा आवडत नसेल. इतका हा समोसा भारतात लोकप्रिय आहे. परदेशातही अनेक लोकांना समोसा आवडतो. पण असा एक देश आहे जिथे समोसा खाण्यावर चक्क बंदी घातली आहे.

हे कारण आहे कारणीभूत

सोमालिया या देशात कोणीही समोसा खाऊ शकत नाही. इथे समोसा खाण्याला बंदी आहे. समोसाच्या आकारामुळे ही बंदी घालण्यात आली आहे. पण आकाराचा काय संबंध असं कुणालाची वाटू शकतं. समोसाचा आकार त्रिकोणी असतो. सोमालियातील एका अतिरेकी गटाला असे वाटते की, समोसाचा त्रिकोणी आकार हा ख्रिश्चन समुदायाच्या जवळचा आहे. तो त्यांच्या पवित्र चिन्हाशी मिळता जुळता आहे. ही लोकं या चिन्हाचा आदर करतात. त्यामुळे सोमालियामध्ये समोसावर बंदी घालण्यात आली आहे.

samosa

जर इथल्या लोकांनी समोसा तयार केला, विकत घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना शिक्षा होऊ शकते. काही अहवालांमध्ये सोमालियामध्ये समोसा करताना प्राण्यांचे मांस वापरण्यात आले होते, असा दावा करण्यात आला आहे. तसेच या देशात समोसा आक्रमकतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळेच त्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT