Modak  Esakal
फूड

Food: बाप्पाला चतुर्थी निमित्त दाखवा मोदक खीरीचा नैवेद्य

आज हिंदु कॅलेंडर नुसार संकष्टी चतुर्थी आहे; लाडक्या बाप्पासाठी आज अनेक लोक उपवास करतात

सकाळ डिजिटल टीम

आज हिंदु कॅलेंडर नुसार संकष्टी चतुर्थी आहे; लाडक्या बाप्पासाठी आज अनेक लोक उपवास करतात; आणि रात्री चंद्रोदय झाला की बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवून उपवास सोडतात. पण आज एक वेगळी आणि भन्नाट रेसिपी आम्ही तुमच्या बरोबर शेअर करतो आहोत.

आज रात्री ०८.४६ मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे; म्हणजे आपण या नंतर बाप्पाला नैवेद्य दाखवून आपला उपवास सोडू शकतो. मोदक हा गणपती बाप्पाचा अतिशय आवडता पदार्थ मानला जातो. चला जाणून घेऊया मोदक खीर बनवण्याची सोपी रेसिपी.

मोदक खीर साठी साहित्य

दूध - दीड लिटर

ताजी साय - 1/2 कप

तांदळाचे पीठ - 1 कप

पिठी साखर - 2 टीस्पून

 पिस्ता - 2 टीस्पून

 वेलची पावडर - दिड टीस्पून

 केशर - एक चिमूटभर

 देसी तूप - 1 टीस्पून

 साखर - दिड कप

 मीठ - चिमूटभर

मोदक खीर कशी बनवायची

मोदक खीर बनवण्यासाठी सगळ्यात आधी तांदळाचे पीठ मिक्सिंग बाऊलमध्ये घ्या. त्यात चिमूटभर मीठ आणि गाईचे तूप घाला. आता त्यात पिठी साखर आणि वेलची पावडर घालून मिक्स करा. यानंतर त्यात उकळलेले पाणी घालून पीठ मळून घ्या. हे पीठ थोडा वेळ बाजूला ठेवा.

पीठ जरा थंड झाल्यावर तळहातावर तूप लावून पिठाचे छोटे गोळे तयार करा. एका प्लेटमध्ये बाजूला ठेवा. पूर्ण पिठाचे गोळे तयार करून स्टीमर मध्ये हे गोळे 8-10 मिनिटे वाफवून शिजवा. जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही यासाठी कुकर देखील वापरू शकता.

आता एका भांड्यात दूध काढून मध्यम आचेवर गरम करायला ठेवा. दूध गरम असताना सतत ढवळत राहा. दूध उकळून घट्ट झाल्यावर गॅसची आंच कमी करून त्यात अर्धी वाटी साखर, वेलची पूड, साय आणि केशर घालून मिक्स करा. 

यानंतर वाफवलेले गोळे दुधात टाकून झाकण ठेवून शिजू द्या.  5-7 मिनिटांत हे गोळे मऊ होतील आणि खीर मलाईदार होईल.  त्यानंतर गॅस बंद करा. मोदक खीर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी तयार आहे. सर्व्ह करण्यापूर्वी तुम्ही ती पिस्त्याने देखील सजवू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT