Shevaga Biryani Sakal
फूड

रेसिपी विथ ट्विस्ट : शेवगा बिर्याणी

प्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन भिजत घालावा. दोन तास तरी तांदूळ भिजला पाहिजे. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन टोमॅटो, दोन कांदे, कोथिंबीर, पुदिना यांची पेस्ट करून घ्यावी.

सकाळ वृत्तसेवा

- सायरा मालदार

साहित्य -

मोठी कणी असलेला कोणताही तांदूळ किंवा बिर्याणी राइस पाव किलो, मीठ, लाल मिरची पावडर, तीन कांदे, दोन टोमॅटो, कापलेली कोंथिबीर आणि पुदिना, एक चमचा गरम मसाला पावडर, चार ते पाच शेवग्याच्या शेंगा, खडा गरम मसाला, हळद पूड.

कृती -

प्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन भिजत घालावा. दोन तास तरी तांदूळ भिजला पाहिजे. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन टोमॅटो, दोन कांदे, कोथिंबीर, पुदिना यांची पेस्ट करून घ्यावी. नंतर गॅसवर भांडे ठेवून एक कांदा कापून घालावा.

कांदा लालसर झाल्यावर त्यात मिक्सरच्या भांड्यातली पेस्ट घालून शेवग्याच्या शेंगा घालून छान वास सुटेपर्यंत हलवून घ्यावे. यात थोडे पाणी घालावे. चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर आणि हळद घालावी. भिजत ठेवलेला तांदूळ दुसऱ्या एका भांड्यात पाणी घालून शिजवून घ्यावा. शिजवताना मीठ आणि खडा गरम मसाला घालावा.

हा भात गाळणीत गाळून घ्यावा आणि शेवग्याच्या मिश्रणावरती पसरवावा. वरून तळलेला कांदा कोथिंबीर घालून थोडेसे तूप सोडून अर्धी वाटी दूध टाकून झाकून ठेवावा. खाली तवा ठेवून बारीक गॅसवर ठेवावा. अर्ध्या तासात बिर्याणी रेडी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दरवर्षी बाळंतपण! वंशाला हवेत दोन दिवे; पाचव्यानंतर सहावं पोटात, डॉक्टरने पती-पत्नीला झापझाप झापलं; व्हिडीओ व्हायरल

'सुनेला सासरी जुळवून घे...' म्हणणं क्रूरता नाही; सुप्रीम कोर्टाचे मोठे निरीक्षण, वैवाहिक वादांत कायद्याचा गैरवापर टाळा

IPL 2026: Mumbai Indians च्या अपयशानंतर हार्दिक पांड्यानं उचललं मोठं पाऊल; जगभरातील चाहत्यांना बसला धक्का, नेमकं काय केलं?

Metro Lines 5A and 12A: कल्याण-नवी मुंबई प्रवास आणखी सोपा होणार! MMRDA नवे मेट्रो नेटवर्क उभारणार; मार्ग कसा असणार?

Pune Car Accident : पुण्यात पुन्हा 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा थरार; दारूच्या नशेत 19 वर्षीय तरुणाने भरधाव चालवली कार, गाडी थेट गरवारे पुलावरून कोसळली खाली

SCROLL FOR NEXT