healthy methi paratha Esakal
फूड

Shravan 2022: हेल्दी मेथीचा पराठा कसा तयार करायचा?

तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तसंच हेल्दी रेसिपीचा ऑप्शन शोधत असाल तर मेथीचा पराठा हा एक चांगला पर्याय आहे

दिपाली सुसर

तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तसंच हेल्दी रेसिपीचा ऑप्शन शोधत असाल तर मेथीचा पराठा हा एक चांगला पर्याय आहे. ब्रेकफास्ट शिवाय मेथीचा पराठा तुम्ही डब्यातही पॅक करून मुलांना किंवा घरातील इतर सदस्यांना देऊ शकता.

साहित्य:

● दोन वाटी गव्हाचे पीठ

● एक जुडी मेथीची पाने

● अर्धा वाटी बेसन

● एक चमचे लसूूण पेस्ट

● एक चमचे तीळ

● एक चमचे तूप

● ओवा, हळद, मीठ, तिखट गरजेनुसार

कृती:

आवश्यकतेनुसार मीठगव्हाचं कणिक, मेथीची पानं, ओवा, तीळ, लसणाची पेस्ट, हळद, लाल तिखट पावडर टाकून सर्व सामग्री मिक्स करा

एका भांड्यात दोन वाटी गव्हाचं कणिक आणि एक जुडी मेथीची पानं घेऊन व्यवस्थित मिक्स करा. या मिश्रणात एक चमचा ओवा, एक चमचा तीळ,एक चमचा लसणाची पेस्ट, चिमुटभर हळद, लाल तिखट पावडर टाकून सर्व सामग्री चांगली मिक्स करुन घ्यावे.

पीठात मीठ टाकून मिश्रण एकजीव करावे.

नंतर हा पीठाचा गोळा थोडंसं तेल घालून चांगला मळून घ्यावा. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मऊ होईपर्यंत चांगलं मळून घ्या.कणिकेला पराठ्यासारखा गोल आकार द्यावा. भिजलेल्या पीठाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या आणि त्या प्रत्येक गोळ्याला पराठ्यासारखा गोल आकार द्या.पराठा दोन्ही बाजूंनी चांगला खुसखुशीत भाजून घ्यावे. पराठा भाजताना त्यावर आपल्या आवडीनुसार तेल किंवा साजूक तूप घाला.तयार झाले आपले गरमा गरम, खमंग आणि पौष्टिक असे मेथीचे पराठे!

अशारितीने तयार झाले आपले गरमा गरम, खमंग आणि पौष्टिक असे मेथीचे पराठे! या मेथी पराठ्यांचा तुम्ही सकाळी व संध्याकाळी चहा किंवा कॉफीसोबत आस्वाद घेऊ शकता. हे पराठे तुम्ही दही, सॉस किंवा हिरव्या चटणीसोबतही खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT