Sabudana Khee Esakal
फूड

Shravan 2022: सोमवारच्या उपवासासाठी साबुदाण्याची खीर कशी तयार करायची ?

साबुदाण्याची खीर हा उपवासाच्या फराळातील लोकप्रिय पदार्थ आहे.

सकाळ डिजिटल टीम

हा गोड पदार्थ बहुतांश घरांमध्ये उपवासाच्या तसंच वेगवेगळ्या व्रताच्या दिवशी आवर्जून तयार केली जाते. उपवासाच्या फराळातील हा लोकप्रिय पदार्थ आहे. महत्त्वाचे म्हणजे ही खीर तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. जाणून घेऊया साबुदाणा खिरीची सोपी रेसिपी.

साहित्य:

1) एक वाटी साबुदाणा

2) अर्धा लिटर दूध

3) अर्धा वाटी साखर

4) केशर

5) वेलची पावडर

6) काजू

7) बदाम

8) पाणी

कृती:

सर्वप्रथम साबुदाणा स्टार्च निघेपर्यंत पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. यानंतर साबुदाणा तासाभरासाठी पाण्यात भिजत ठेवावा.

साबुदाणा भिजला की इकडे गॅसवर दूध उकळायला ठेवावेहे दूध घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहावे.

दूध बऱ्यापैकी घट्ट झाले की दुधामध्ये भिजवलेला साबुदाणा मिक्स करावा.

आणि हे मिश्रण गॅसच्या मध्यम आचेवर चांगले शिजू दयावे.

दहा मिनिटानंतर दूधात टाकलेला साबुदाणा मऊ झाले आहेत की नाहीत, याची खात्री करून घ्या.

नंतर मग या शिजलेल्या मिश्रणात दोन ते तीन मिनिटांनंतर साखर मिक्स करावी.

यानंतर वेलची पावडर आणि केशरच्या दोन ते तीन काड्या देखील मिश्रणात मिक्स कराव्यात.

आणि पुढच्या पाच मिनिटांत गॅस बंद करावा.गरमागरम किंवा फ्रिजमध्ये थंड करूनही खीर सर्व्ह करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT