Shravan 2024 esakal
फूड

Shravan 2024: श्रावणात उपवासाला खमंग अन् खुसखुशीत साबुदाणा वडा खायचांय? मग, बनवताना 'या' चुका करणे टाळा

Shravan 2024 Fasting Tips: श्रावणात अनेक जण उपवास करतात आणि उपवासाला साबुदाणा वडा हमखास बनवला जातो.

Monika Lonkar –Kumbhar

Shravan 2024 : हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना अतिशय महत्वाचा मानला जातो. भगवान शंकरांना हा महिना अतिशय प्रिय आहे. या महिन्यात महादेवाची आणि देवी पार्वतीची खास पूजा केली जाते. भगवान शंकरांना हा महिना समर्पित असून, धार्मिकदृष्ट्या या महिन्याला विशेष महत्व आहे. दक्षिण भारतीय पंचांगानुसार, यंदा हा श्रावण महिना महाराष्ट्रात ५ ऑगस्टला (सोमवारी) सुरू होणार आहे.

या महिन्यात अनेक जण श्रावणी सोमवारचे व्रत करतात. या दिवशी भगवान शंकरांची पूजा अर्चना करून उपवास केला जातो. काही जण निरंकार उपवास करतात तर काही जण उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपवास करतात. श्रावणात साबूदाणा वडा हमखास बनवला जातो.

परंतु, अनेक जण हा साबुदाणा वडा करताना काही चुका करतात. ज्यामुळे, हा साबुदाणा वडा फसतो. जर तुम्हाला खुसखुशीत आणि खमंग असा साबुदाणा वडा बनवायचा असेल तर तुम्ही देखील या चुका करणे टाळा. कोणत्या आहेत त्या चुका? चला तर मग जाणून घेऊयात.

कमी वेळासाठी साबुदाणा भिजवणे

जेव्हा तुम्ही साबुदाणा वडा बनवत असाल किंवा साबुदाण्याची खिचडी बनवण्याचा विचार करत असाल तेव्हा साबुदाणा नीट भिजवून घेणे हे फार महत्वाचे आहे. अनेकदा असे घडते की, साबुदाणा न धुता भिजवला जातो, किंवा घाईगडबडीत कमी वेळासाठी भिजवला जातो.

मग, अशावेळी तो नीट भिजवला गेला नसल्यामुळे, साबुदाणा कच्चा राहू शकतो. त्यामुळे, ही चुक करणे सर्वात आधी टाळा. जर तुम्हाला खुसखुशीत, मऊ आणि खमंग साबुदाणा वडा हवा असेल तर साबुदाणा आधी स्वच्छ धुवा आणि किमान ४-५ तास किंवा रात्रभर भिजत ठेवा.

पाणी नीट काढून न टाकणे

साबुदाणा भिजवल्यानंतर त्यापासून साबुदाणा वडा बनवण्यापूर्वी त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकणे, महत्वाचे आहे. अन्यथा तुमचा वडा चिकट होईल. तसेच, साबुदाण्यामध्ये जास्त ओलावा असेल, पाणी जर राहिले असेल तर असे वडे तळताना तुटतात किंवा खूपच मऊ आणि चिकट होतात. त्यामुळे, साबुदाणा भिजवताना जास्त पाणी वापरणे टाळावे.

स्मॅशिंग व्यवस्थित न करणे

साबुदाणा वडा बनवताना बटाटा, शेंगदाण्यांचा कुट, हिरवी मिरची, लिंबाचा रस इत्यादी गोष्टींचा वापर प्रामुख्याने केला जातो. त्यामुळे, हे वडे बनवताना बटाटा  चांगल्या प्रकारे स्मॅश करणे महत्वाचे आहे. अनेकदा बटाटा चांगल्या प्रकारे स्मॅश केला जात नाही. त्यामुळे, वड्याचा पोत बिघडतो आणि तळताना वडे फुटतात. त्यामुळे, साबुदाणा वडा बनवताना त्यात असलेले घटक चांगल्या प्रकारे आणि हलक्या हातांनी स्मॅश करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT