Beetroot Esakal
फूड

Shravan food Recipe: घरातील सदस्य बीट खात नाहीत? बनवून बघा हे हेल्दी आणि टेस्टी बीटरूट कटलेट..

बीट आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

सकाळ डिजिटल टीम

Beetroot: बीट आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बीट आणि बटाटा एकत्र करून तयार केलेले कटलेट्स हेल्दी तसेच चवीला उत्कृष्ट असतात. बऱ्याचदा सकाळच्या नाश्त्याची रेसिपी हा घरांमध्ये मोठा प्रश्न असतो. ब्रेकफास्ट नेहमी हेल्दी आणि चविष्ट असा असावा असे प्रत्येकाला वाटते. बीट आणि बटाटा कटलेट या दोन्हींची पूर्तता करते. ही रेसिपी लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही आवडते. चला तर मग बघू या बीटरूट कटलेट कसे तयार करायचे याची रेसिपी..

साहित्य:

1) दोन मध्य आकाराचे बीट

2) दोन मध्य आकाराचे बटाटे

3) जिरे पावडर ,लाल तिखट ,चाट मसाला

4) मीठ चवीनूसार

5) तेल - तळण्यासाठी

कृती:

सर्वप्रथम बीटरूट कटलेट बनवण्यासाठी प्बटाटे आणि बीट स्वच्छ धुवून नंतर उकडून घ्यावे.यानंतर बटाट्याची साल काढून मिक्सिंग बाऊलमध्ये घेऊन बटाटा चांगला मॅश करावा.

बटाटा चांगला मॅश झाला कीउकडलेले बीट त्यात टाकावे आणि नंतर दोन्हीही व्यवस्थित मॅश करून एकजीव करून घ्यावे. नंतर यामध्ये जिरेपूड, लाल तिखट, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व मिश्रण नीट मिसळून टाकावे.

आता हे मिश्रण हातावर घेऊन आणि याचे कटलेट तयार करून घ्यावे.कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करावे.

तेल गरम झाल्यावर त्यात आधीच तयार केलेले कटलेट्स एक एक करून टाका.त्यानंतर कटलेट तळून घ्या. त्यांचा रंग गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यावे.

कटलेट चांगले तळण्यासाठी 4-5 मिनिटे लागतील. त्याचप्रमाणे सर्व कटलेट तळून घ्या. तुमचे बीटरूट बटाट्याचे कटलेट नाश्त्यासाठी तयार आहेत. त्यांना चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Oman Sea Attack : ओमानच्या समुद्रात इराणचा हल्ला; भारतीय जहाज लक्ष्य, तीन जणांचा मृत्यू

Iran-Israel War: खामेनेई यांचं भारतातल्या 'या' गावाशी होतं खास कनेक्शन; मृत्यूची बातमी कळताच गावावर शोककळा

Beetroot Sprouts Chilla: सकाळचा नाश्ता हेल्दी आणि हटके हवाय? मग हा बीट-स्प्राऊट्स चिला एकदा ट्राय कराच!

इराणच्या हल्ल्यातून थोडक्यात वाचला ध्रुव राठी, पहाटे दुबई विमानतळावरून केलं होतं उड्डाण, कुटुंबीय अजूनही अडकलेले

भाजप की राष्ट्रवादी? अमरावती मनपाच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे? 'या' दिवशी होणार निर्णय, सभापती पदासाठी महायुतीत चढाओढ

SCROLL FOR NEXT