Shravan Recipe esakal
फूड

Shravan Recipe : सणावारांच्या या महिन्यात ट्राय करा नवी स्वीट डिश, गुळ-खोबऱ्याच्या सारोट्या

श्रावण महिना सुरु झाला की, एका पाठोपाठ सणवार सुरू होतात.

धनश्री भावसार-बगाडे

Gul Khobare Sarotya Recipe In Marathi :

यंदा अधिकमास आल्याने श्रावण एक महिना पुढे सरकला. अधिक महिन्यात कोणतेही शुभ कार्य होत नसल्याने श्रावण सुरु होताच गोडधोड करण्याचे अनेक निमित्त मिळणार आहेत. अशावेळी नेहमीचेच प्रकार करण्याऐवजी आम्ही अजून एक पर्याय सुचवत आहोत.

ही गुळ खोबऱ्याच्या सारोट्यांची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • 1 वाटी बारीक रवा

  • 1 वाटी तीळ

  • 1/2 वाटी शेंगदाणे

  • 1/2 वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस

  • 1 वाटी गूळ

  • 1 चमचा वेलची पूड

  • तूप

कृती

  • सर्वप्रथम रव्यात 1 चमचा गरम तूप घालून ते पाण्याने मळून घ्यावे आणि बाजूला ठेवावे.

  • त्यानंतर तीळ मंद आचेवर भाजून घ्यावेत. त्यानंतर शेंगदाणे आणि खोबऱ्याचा कीसदेखील भाजून घ्यावा.

  • तीळ आणि शेंगदाण्याचे कूट एकत्र बारीक करून घ्यावे आणि गूळ बारीक किसून घ्यावा.

  • आता तीळ आणि शेंगदाण्याचे कूट, खोबऱ्याचा कीस आणि गूळ एकत्र करून हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये एकत्र बारीक करून घ्यावे.

  • आता बारीक केलेल्या तयार मिश्रणात वेलची पूड देखील घालावी.

  • आता दुसरीकडे भिजवलेल्या रव्याचे बारीक गोळे करावे आणि प्रत्येक गोळ्याची पारी करून त्यात 1 चमचा तीळ-खोबऱ्याचं मिश्रण घालून सारोट्या हलक्या हाताने सारोट्या लाटून घ्याव्या.

  • नंतर गरम तव्यावर तूप टाकून सारोट्या खरपूस भाजून घ्याव्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT