Shravan Special Recipe : बहुगुणी शेवग्याच्या पानांची भाजी कशी तयार करतात? Esakal
फूड

Shravan Special Recipe : बहुगुणी शेवग्याच्या पानांची भाजी कशी तयार करतात?

शेवग्यामध्ये प्रथिनं, अमीनो अॅसिडस्, बीटा-कॅरोटीन असतात

सकाळ डिजिटल टीम

Moringa Leaves : शेवग्याचं झाड अतिशय वेगानं वाढतं. त्याच्या शेंगांबरोबरच पानं, फुलंदेखील खाण्यासाठी वापरली जातात. या झाडाचे हे तीनही भाग खूप फायदेशीर आहेत. शेवग्यामध्ये प्रथिनं, अमीनो अॅसिडस्, बीटा-कॅरोटीन आणि वेगवेगळ्या प्रकारचे फिनॉलिक असतात जे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात. आजच्या लेखात आपण बहुगुणी शेवग्याच्या पानांची भाजी कशी तयार करतात याची सविस्तर रेसिपी पाहू या...

साहित्य:

शेवग्याची कोवळी पाने

एक वाटी तांदळाचे पीठ

एक कांदा बारीक चिरलेला

आले-लसूण-मिरचीची पेस्ट

लाल मिरच्या

लाल तिखट

हळद

जिरे

मोहरीचे तेल

मीठ चवीनुसार

कृती:

शेवग्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम शेवग्याची पाने देठापासून वेगळी करा. नंतर दोन ते तीन पाण्याने धुवा. आता ती बारीक चिरून घ्या. एका मोठ्या भांड्यात या चिरलेल्या पानांमध्ये तांदळाचे पीठ चांगले मिक्स करा. आता कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे तडतडून घ्या. आले-लसूण आणि मिरचीची पेस्ट टाका आणि नीट परतून घ्या.

पेस्ट भाजल्यावर त्यात कांदा घाला. सोबत अख्खी लाल मिरची घालावी. मंद आचेवर कांदे चांगला परतवून घ्या. नंतर त्या तांदळाच्या पिठात मिक्स केलेले शेवग्याचे पाने टाका आणि मिक्स करा. मीठ टाकून एकदा नीट मिक्स करा. मंद आचेवर भाजी चांगली शिजवा. तुमची चविष्ट क्रिस्पी शेवग्याच्या पानांची भाजी तयार आहे. पोळी किंवा वरण-भातसोबत सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी मोठं अपडेट! अहवाल कधी येणार? पगारवाढ कधी? संसदेत सरकारने दिली माहिती

Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेनंतर हिंदूत्ववादी संघटनांकडून मंचाचे शुद्धीकरण; काँग्रेसचा भाजपवर निशाणा- हा तर दलितांचा अपमान

Ghatkopar Landslide Case: मुंबईतील मुक्काम ठरला अखेरचा! घाटकोपरमध्ये दरड कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत

Ghatkopar Landslide: भाच्यांना वाचवले, पण मुलाला गमावले; घाटकोपर दुर्घटनेत १६ वर्षीय मोहम्मदचा मृत्यू

Child Cancer: मुलांभोवती कर्करोगाचा विळखा घट्ट! चौदा वर्षांपर्यंतच्या मुलांना मोठा धोका; अन्य ‘सार्क’ देशांतील आजार वाढला

SCROLL FOR NEXT