Shravan Special Recipe Esakal
फूड

Shravan Special Recipe : कांदा, लसूण न वापरता तयार करा चवदार बटाट्याची भाजी..

लसूण आणि कांदा दोन्ही उष्णतावर्धक पदार्थ आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Vegetarian Food Recipe : श्रावण महिना सुरू झाला असून या महिन्यात अनेक घरांमध्ये कांदा-लसूणाशिवाय जेवण बनवले जाते. लसूण आणि कांदा दोन्ही उष्णतावर्धक पदार्थ आहेत. दोन्ही पदार्थ ग्रहण केल्यावर शरीरात उष्णता वाढते. त्यामुळेच यांना तामसिक भोजन श्रेणीत गणले जाते. ह्या पदार्थांचं सेवन केल्याने काम वासना देखील प्रचंड वाढते.ज्यामुळे माणसात अपप्रवृत्तीचा संचार होण्याची शक्यता असते. त्याने मनुष्य अध्यात्म, चिंतन या पासून लांब जातो व स्वभाव अतिशय उग्र होतो अशी धारणा आहे.श्रावण स्पेशल आम्ही तुमच्यासाठी खास बटाट्याच्या भाजीची अशी रेसिपी घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये कांदे आणि लसूण सोबत टोमॅटोचा वापर केला जाणार नाही.(Latest Marathi News)

साहित्य :

चार उकडलेले बटाटे

तूप

दोन चमचे बेसन 

दोन सुक्या लाल मिरच्या

आल्याचा तुकडा बारीक चिरून

हिरव्या मिरची 

चिमूटभर हिंग

एक चमचा मेथी

बारीक केलेले धणे, बडीशेप 

काश्मिरी लाल तिखट 

हळद

कोथिंबीर

कृती :

सर्वप्रथम गॅसवर एक मोठी कढई ठेवा आणि त्यात तूप घालावे. तूप गरम झाल्यावर त्यात हिंग,कोथिंबीर, एक चमचा ठेचलेली बडीशेप घाला.आता त्यात दोन कोरड्या लाल मिरच्या, आल्याचा बारीक तुकडा घालून ढवळा. यानंतर त्यात बेसन घालून अर्धा मिनिट परतून घ्या.शेवटी दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चिमूटभर हिंग, एक चमचा मेथी, हळद आणि लाल मिरची घाला.सर्व मसाले भाजून झाल्यावर त्यात उकडलेले बटाटे घालून चांगले परता. आता त्यात दोन वाटी पाणी आणि मीठ घालून मंद आचेवर आठ ते दहा मिनिटे उकळा. दहा मिनिटांत भाजी पुरीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Women’s World Cup 2025 Ind vs Pak : आज भारत-पाकिस्तान आमनेसामने, महिला खेळाडू हस्तांदोलन करणार?

MPSC 2025: खुल्या प्रवर्गाने परीक्षा द्यायची नाही का? ‘राज्य कर निरीक्षक’ पदासाठी शून्य जागा; विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai News: मुंबईच्या गजबजाटात हरवलेल्या दोन मुलींना शोधण्याची आईची धडपड, पोलिसांची रात्रंदिवस मेहनत

Mahashtra Farmers : अतिवृष्टीमुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, उत्पादनात घट

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

SCROLL FOR NEXT