Papai Chatney 
फूड

अशी बनवा आरोग्यवर्धक पपईची चटणी ! 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पपई स्वादिष्ट तर आहेच, शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी. सहज पचणारे फळ आहे. पपई भूक आणि शक्ती वाढविते. प्लीहा, यकृत रोगमुक्त ठेवणारे आणि कावीळ यासारख्या रोगांपासून मुक्ती देणारे हे फळ आहे. पपई शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करते. वजन घटवण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. मधुमेहींसाठी गुणकारी, डोळ्यांचे आरोग्य सुधारते, सांधेदुखीपासून आराम मिळतो, पचन सुधारते. अशा या अनेकविध गुणकारी पपईची चटणी टेस्टी बनते. चला तर मग पपईची चटणी कशी बनवली जाते याची कृती जाणून घेऊया... 

साहित्य... 
500 ग्रॅम कच्चा पपई, 300 ग्रॅम साखर, 25 ग्रॅम खजूर, 25 ग्रॅम मनुका, 25 ग्रॅम आमचूर, 25 ग्रॅम लाल तिखट, 1 टी स्पून जिरे, 1 टी स्पून राई, 2 टीस्पून मिरपूड, 2-3 तुकडे दालचिनी, 2 मोठी वेलची, 2 लवंगा, चवीनुसार मीठ. 

कृती... 

  • एक पपई सोलून त्याचे लहान तुकडे करा. त्यांना पाण्यात उकळा. उकळल्यावर एकदा काढा. एक- दोन उकळ्यांनंतर तुकडे काढा आणि सुमारे एक तास उन्हात वाळवा. 
  • जिरे, राई, मिरपूड, दालचिनी, मोठी वेलची, लवंगा बारीक पिसून घ्या. त्यात आमचूर आणि लाल तिखट घाला. 
  • फ्राय पॅनमध्ये साखर घाला. सुमारे 1 ग्लास पाणी घाला. जेव्हा थोडंसं घट्ट होण्यास सुरवात होते तेव्हा पिसून ठेवलेले मसाले घाला. बारीक चिरलेले खजूर आणि मनुका मिसळा. पपईचे तुकडे घालून शिजवा. चवीनुसार मीठ घाला. 
  • कच्च्या पपईची चटणी तयार आहे. आपण इच्छित असल्यास, त्यात अर्धा टी स्पून ऍसिटिक ऍसिड टाकू शकता, यामुळे चटणी जास्त काळ टिकेल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT