South Indian style Rajma Rice Recipe 
फूड

अवघ्या १५ मिनिटात असा तयार करा टेस्टी साउथ इंडियन स्टाइल राजमा राइस

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जर आपण काही डिशेसबद्दल चर्चा करत असाल तर भारतीय तांदळाचे डिशेस या यादीमध्ये सर्वात आधी असतील. डाळ भातपासून खिचडी किंवा वाडग्यात साधी दही भात असे अनेक पर्याय आहेत, ज्यांना आपण अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही. दुसरीकडे साउथ इंडियन खाद्यपदार्थातामध्ये तुम्हाला बर्‍याच तांदळाचे डिशेस पाहायला मिळतात जे स्वादिष्टही असतात. तांदूळ दक्षिण भारतातील बहुतेक प्रादेशिक पाककृतींमध्ये महत्वाची भूमिका बजावते.  

व्हेज-नॉनव्हेज बिर्याणी ही अनेकांची आवडती डिश असल्यामुळे अनेकांच्या मनात ती जागा निर्माण केली आहे. त्यात पण राजमा राइसची डिश पाहिल्यानंतर कुणीही याला नाकारू शकत नाही. आमच्याकडे साउथ इंडियन राजमा राइसची एक अप्रतिम रेसिपी आहे जी फक्त 15 मिनिटांत तयार केली जाऊ शकते, जे रात्रीच्या मेजवानीसाठी झटपट तयार करता येईल. साउथ इंडियन राजमा राइस बनवण्यासाठी केवळ 15 मिनिटे लागतात. हे घरीसुद्धा गेट-टूगेदरसाठी देखील योग्य डिश आहे आणि जर आपण एखाद्या दिवशी लंच किंवा डिनरसाठी वेगळी डिश शोधत असाल तर ही एक उत्कृष्ट डिश नक्कीच असेल. 

साहित्य 

तांदूळ 175 ग्रॅम
तेल 4 चमचे
ढोबळी मिरची 1 
लाल भोपळी मिरची 1 
चिरलेला कांदे 2  
हिरव्या मिरच्या
चिरलेला टोमॅटो 3 
राजमा (सोयाबीन) 100 ग्रॅम
ताजी तुळशीची पाने 
लाल तिखट १ टीस्पून
लसूण पावडर १/२ टीस्पून 
मिरपूड १/२ टीस्पून
मीठ
कोथिंबीर 

कृती : सुरवातीला कुकर किंवा पातेल्यामध्ये तांदूळ शिजवून घ्या. राजमा गरम पाण्यातून बाजूला काढून ठेवा.  गॅसवर कढई ठेवून त्यात तुम्ही तेल किंवा आवडीनुसार तूप वापर शकता. तेल गरम झाल्यावर चिरलेला कांदा, हिरवी मिरची, ढोबळी मिरची आणि टोमॅटो हे सर्व मिक्स करा. त्यानंतर त्यात तिखट लसूण पावडर आणि मिरेपूड टाका. लगेच त्यात भिजवलेले सोयाबीन आणि शिजवलेले तांदूळ मिक्स करून एकत्र करून घ्या. त्यात खिसलेला नारळ, कोथिंबीर याचा वापर करून त्याला एक सुवासिक दक्षिणेचा चव मिळतो जो आपण चाखल्याशिवाय राहूच शकत नाही. अशा पद्धतीने अवघ्या १५ मिनीटात टेस्टी साउथ इंडियन स्टाइल राजमा राइस तयार होईल. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT