Mango Sandan Recipe Sakal
फूड

आंबे खाऊन कंटाळलाय? आता खा 'आंब्याची इडली'! जाणून घ्या रेसिपी

आंबे, रस खाऊन कंटाळला असाल तर "आंबा सांदण" हा एक अनोखा कोकणी पदार्थ नक्की करुन बघा.

दिपाली सुसर

Mango Food: आंबे, रस खाऊन कंटाळला असाल तर "आंबा सांदण" हा एक अनोखा कोकणी पदार्थ नक्की करुन बघा. दिसायला भारी दिसतो अन खायला तर अप्रतिम लागतो. आंबा सांदण म्हणायला जरा कठिण वाटतं असेल तर तुम्ही सोप्या भाषेत आंब्याची ईडली देखील म्हणू शकता.

आंबा सांदण करता लागणारे साहित्य:

1) एक वाटी इडली रवा (थोडा भाजलेला)

2) दीड वाटी आंब्याचा रस

3) अर्धी वाटी दूध

4) साखर (आवडीनुसार)

5) एक चमचा तूप

6) अर्धा लहान चमचा बेकिंग पावडर, चिमुटभर मीठ .

आंबा सांदण कृती:

  • भाजलेला इडलीचा रवा, आंब्याचा रस, दूध, साखर मीठ आणि तूप सगळं एकजीव करुन घ्यावे.

  • नंतर या मिश्रणात लागेल तितक पाणी घालुन इडलीच्या पिठा सारखं सरसरीत भिजवून एक तासभर बाजुला ठेवून द्यावे.

  • जेणेकरून रवा चांगला भिजेल जर का एखाद्या वेळेला पीठ घट्ट वाटले तर त्यात थोडं दूध टाकाव.

  • नंतर त्या मिश्रणात बेकिंग पावडर घालून हलक्या हाताने मिश्रण पुन्हा एकदा चांगले फेटुन घ्यावे .

  • पुढे मग इडली पात्राच्या साचाला थोडसं तुप लावुन हे मिश्रण घालून इडली सारखं 12 ते 15मिनिटं वाफवून घ्यावं.

  • वाफवून झाल्यानंतर पाच मिनटांनी बाहेर काढून थोडं थंड झालं की इडलीच्या साच्यातून सांदण काढावीत आणि मस्त साजुक तुप टाकुन गरम गरम खावुन टाकावीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT