Sakal - 2021-02-26T215642.764.jpg
Sakal - 2021-02-26T215642.764.jpg 
फूड

गाजरचा हलवा खाऊन कंटाळा आला? ट्राय करा टेस्टी गाजराची खीर!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जर तुम्हाला गाजरचा हलवा खाऊन कंटाळा आला असेल आणि तुम्हाला काही तरी नवीन ट्राय करायचं असेल तर गाजराच्या खीरचा नक्कीच आस्वाद घ्या. कारण गाजराची खीर ही एक पौष्टिक रेसिपी आहे. . सण-उत्सवानिमित्त तुम्ही गाजराच्या खिरीचा खास बेत आखू शकता. गाजरामध्ये ‘व्हिटॅमिन ए’चे प्रमाण भरपूर असते. या खीरची चव खूप छान असते. या खीरमध्ये जास्त साहित्याचा वापर होत नाही. ही खीर रात्री जेवल्यानंतर किंवा दिवसभरात कोणत्याही वेळी सर्व्ह केली जाऊ शकते. चांगली गोष्ट ही आहे की, गाजराची खीर लहान मुलं खूप चवीनं खातील. ही खीर काही मिनिटांमध्येच तयार होते. यातील अन्य पोषण तत्त्व देखील आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत. घरच्या घरी कशी तयार करायची ही पौष्टिक खीर, जाणून घेऊया पाककृती...
 

साहित्य 
2 मध्यम गाजर ( 1 कप किसलेले गाजर) 
2 मोठे चमचे तूप
11/2 कप दूध
2 मोठे चमचे कंडेन्स्ड मिल्क
5-6 काजू
8-10 मनुका (पर्यायी) 
1 मोठा चमचा साखर
1/4 चमाचा वेलची पावडर

गाजराची खीर बनवण्याची कृती 
-प्रथम गाजर चांगले धुवून घ्या आणि त्यानंतर ते किसून घ्या किंवा मिक्सरमध्ये बारिक करा.

-मध्यम आचेवर एका नॉन-स्टिक पॅनमध्ये 2 मोठे चमचे तूप गरम करा. काजू आणि मनुका वेगळे तळून घ्या, ते एका प्लेटमध्ये काढून घ्या.

-आता त्याच पॅनमध्ये किसलेला गाजर टाकून 4-5 मिनिटांसाठी धीम्या आचेवर हलवा.

-त्यात नंतर दूध टाका, चांगलं मिसळून मध्यम आचेवर उकळवा.
जेव्हा दूध उकळण्यास सुरू झाल्यावर त्यात कंडेंस्ड मिल्क टाका आणि चांगलं मिसळून घ्या. जवळपास 5 मिनिटांसाठी धीम्या आचेवर ते शिजवा आणि अधून-मधून ते हलवत राहा.

-स्वादानुसार साखर टाका. कृपया लक्षात असू दे की, कंडेन्स मिल्क आधीपासूनच गोड असतं. 


-त्यामुळे थोडी अधिक गोडपणा हवा असेल तितकीच साखर टाका.
मिश्रण घट्ट होईपर्यंत किंवा जवळपास 5 मिनिटांपर्यंत शिजवा. हे जास्तवेळ शिजवू नये नाहीतर गाजर आणि दूध जळण्याची भीती असते.


-वेलची पावडर टाकून व्यवस्थित मिश्रण हलवा आणि गॅस बंद करा. त्यानंतर खीर थंड होऊ द्या.


-शेवटी काजू आणि मनुका टाकून गार्निश करा. तुमच्या आवडीनुसार गाजराची खीर गरम किंवा थंड सर्व्ह करा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT