special tips for women for making khari at home 
फूड

महिलांसाठी खास; घरीच खारिक बनवण्याच्या सोप्या टिप्स

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : सणासुदीच्या हंगामात बाजारात ड्रायफ्रुट्ची किंमत वाढते. कोणतीही मिठाई ड्रायफ्रुट शिवाय अधुरीच असते. बाजारामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे ड्रायफ्रुट्स मिळतात. यामध्ये खारीक ही बाजारमध्ये अगदी सहज मिळते. आणि ती आरोग्यासाठी फायद्याची आहे. मिठाईमध्ये तुम्ही याचा उपयोग केला तर ते जास्त स्वादिष्ट होते. साधारणत: तुम्हाला बाजारामध्ये याची व्हरायटी आणि किंमत वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी दिसते. परंतु तुम्हाला जर क्वालिटी आणि पौष्टिक खारिक खायची असेल तर तुम्ही याला घरीच तयार करू शकता. हे बनवण्यासाठी थोडा वेळ लागतो परंतु तुलनेत अधिक स्वस्त, स्वादिष्ट बनते. आणि तुम्हाला सांगू इच्छितो खजुरही बाजारामध्ये मिळतो. तुम्हाला बाजारात कच्ची खजूरी लगेच मिळू शकते. चला तर मग आम्ही तुम्हाला घरीच खजुरापासून खारिक कशी बनवावी याची पद्धत सांगणार आहोत

घरीच तयार करा खारीक 
 

साहित्य - 

  • 1 किलो कच्‍चे खजूर
  • 2 लीटर पानी 
  • 1 मोठी कढई 

सुरुवातीला कच्चे खजूर पाण्यामधून दोन तीन वेळा स्वच्छ धुऊन घ्या. एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ते उकळू द्या. जेव्हा पाणी उकळेल तेव्हा त्यात खजूर टाक. पंधरा ते वीस मिनिटे ते त्या पाण्यात सोडून द्या. आता हे खजूर उन्हामध्ये सुकायला ठेवून द्या. ते दोन दिवसांत सुकून जातील. परंतु उत्तम प्रकारे सुकण्यासाठी त्याला किमान पाच दिवस उष्णता किंवा ऊन द्या. एक वेळा खजूर चांगला सुकला तर समजुन जा की तुमची खारीक तयार आहे. आता हे तुम्ही कोणत्याही एका बंद डब्यात स्टोअर करून ठेवू शकता. खारीकमध्ये पोषक तत्वे असतात या खजूरमध्ये अँटी अक्सिडेंटचे प्रमाण जास्त असते. तुम्ही कोणत्याही वेळी कोणत्या पद्धतीने हे खाऊ शकता. 

याचे फायदे असे

खारीक मध्ये प्रोटीन कॅल्शियम विटामिन ए असे अनेक घटक असतात. जर तुमच्या तोंडात पुरळ येत असतील तर तुम्हाला खारिकची पावडर खावी लागेल. त्यामुळे ते कमी होतात. जर तुम्हाला पचनाच्या वेळी अडचण होत असेल तर तुम्ही खारिक खाऊ शकता. खारीक दुधामध्ये उकळून रात्री खाऊ शकता. जर तुमचं वजन कमी असेल तर तुम्ही खारीक खाऊनही वजन वाढवू शकता. गर्मीच्या दिवसात शरीरामध्ये ग्लुकोजचे प्रमाण कमी होते परंतु खारीक खाल्ल्याने शरीरामध्ये ग्लुकोजचे प्रमाण वाढूही शकते. तसेच शरीरातील उर्जा वाढवण्यासाठीही त्यांचे सेवन करणे गरजेचे असते. कारण यामध्ये कार्बोहायड्रेडचे प्रमाण जास्त असते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Pune MLC Election: शिक्षक, पदवीधर’ची आजपासून रणधुमाळी ;दोन दिवसांत जागा वाटप; सहा ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT