Sprouts are good for the body, so it is called the almond of the poor akola marathi news
Sprouts are good for the body, so it is called the almond of the poor akola marathi news 
फूड

Video `गरिबांच्या बदामा`ची श्रीमंती तर पहा..

विवेक मेतकर

अकोला : फुटाण्याला गरिबांचे बदाम म्हटले जातं. कारण, स्वस्त असूनही यामध्ये मोठमोठ्या आजारांशी लढण्याची क्षमता आहे. हिवाळ्याच्या दिवसांत चणे खाणं त्यामुळेच लाभदायक ठरतं. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे फुटाने तयार करून वर्षभरासाठी साठवले जातात.


अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथील आशाताई तायडे या रेतीच्या भट्टीवर फुटाने तयार करत आहेत. गावासह परिसरातील नागरिकांची त्यांच्याकडे फुटाण्यांची चांगली मागणी असते. मात्र, असे असले तरी ४३ अंशाच्या वर तापमानात गरम भट्टीजवळ तासंतास बसून काम करित राहणे, हे काही साधं काम नाही.


असे तयार होतात फुटाणे...

चला तर मग थोडं जाणुन घेऊया फुटाण्यांच्या गुणधर्मांबद्दल
गुऴ फुटाणे आपण टाईमपास म्हणून नेहमी खातो… मात्र गुळ फुटाणे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे आहे हे आपल्याला माहित नसतं. गुळ फुटाणे खाण्याचे अनेक फायदे आहे… हे खाल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. नेमक्या कोणत्या आजारांवर गुळ आणि फुटाणे फायदेशीर आहे हे पाहू या…

चेहरा उजळतो
गुळ आणि फुटाण्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. यामधील झिंक म्हणजेच जस्त त्वचा उजळण्यास मदत करते. झिंक त्वचेला तजेला प्रदान करते. याचे नियमित सेवन केल्याने स्त्रियांचे सौंदर्य अधिक वाढते.

अपचनापासून मुक्तता मिळते 
गूळ-फुटाणे नियमित खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते. यामुळे अपचन व ऍसिडीटीच्या समस्येपासून सुटका मिळते. स्त्रियांना बहुधा पोटाचा त्रास होतो. अशा वेळी गूळ-फुटाणे खाणे योग्य ठरते.

स्मरणशक्ती वाढते
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अनेक उपाय शोधत असतो. त्यात जर घरगुती उपाय असेल तर मग तो करुन पाहण्यासाठी काहीच हरकत नसावी.  गूळ व फुटाणे खाल्ल्याने बुद्धी तीक्ष्ण होते. यामधील विटॅमिन बी स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते.

दातांची सुरक्षा 
सध्या दातांच्या समस्या वाढत आहेत.. त्यात अनेक जणांना दात दुखणे, दातातून रक्त येणेया समस्या म्हणजे रोजच्या झाल्या आहे. गूळ व फुटाणे दातांना सुरक्षित ठेवतात. यामधील फॉस्फरस दातांसाठी उपयोगी आहे. गर्भावस्थेनंतर स्त्रियांनी गूळ-फुटाणे खायला हवे.

ह्रदयाचे आरोग्य  
वाढत्या प्रदूषणामुळे आणि मानसिक आजारांमुळे ह्रदयाचे आजार वाढत आहेत. यातील पोटॅशियम हार्ट अटॅकपासून रक्षण करते. ह्रदय संबंधित समस्यांसाठी गूळ-फुटाणे उपयोगी आहेत.

फुटाण्याला गरिबांचे बदाम म्हटले जातं. कारण, स्वस्त असूनही यामध्ये मोठमोठ्या आजारांशी लढण्याची क्षमता आहे. हिवाळ्याच्या दिवसांत चणे खाणं त्यामुळेच लाभदायक ठरतं...
पाहुयात, फुटाण्याचे फायदे...

  • *हिवाळ्यात दररोज ५० ग्रॅम फुटाणे खाणे शरीरासाठी खूप लाभदायक आहे. आयुर्वेदानुसार फुटाणे आणि हरभर्‍याची डाळ शरीरासाठी पौष्टिक आहे. फुटाणे खाल्ल्याने अनेक आजार दूर राहतात.
  • यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, आयर्न, कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते. याच्या नियमित सेवनाने सौंदर्य खुलते तसेच स्मरणशक्ती वाढते.
  • लठ्ठपणा कमी करण्यासाठी दररोज नाष्ट्यामध्ये फुटाण्यांचा समावेश करावा.
  • गर्भवतीला उलट्या होत असतील तर भाजलेल्या फुटण्याचे सूप पाजावे.
  • थंडीमध्ये हरभर्‍याच्या पिठाचा हलवा थोडे दिवस नियमित खाल्यास वातामुळे निर्माण होणार्‍या आजारांमध्ये तसेच दम्याच्या त्रासामध्ये आराम मिळेल.
  • रात्री हरभर्‍याची डाळ भिजवून ठेवा. सकाळी ही डाळ बारीक वाटून घ्यावी आणि साखरेच्या पाण्यात मिसळून ते पाणी प्यावे. यामुळे मानसिक तणाव कमी होईल.
  • ५० ग्रॅम फुटाणे उकळून घ्या आणि त्याच उकळलेल्या पाण्यामध्ये बारीक करा. हे कोमात पाणी एक महिनाभर पिल्यास जलोदर रोग दूर होईल.
  • हरभर्‍याच्या पिठाच्या मीठ न घालता केलेल्या पोळीचे ४० ते ६० दिवस सेवन केल्यास त्वचेशी संबंधित आजार दूर होतील.
  • भाजलेले फुटाणे रात्री चावून खावेत आणि त्यानंतर गरम दुध प्यावे. या उपायाने श्वासानाशी संबधित रोग तसेच कफ दूर होतो.
  • सरासरी १00 ग्रॅम फुटाण्यांमध्ये २२.५ ग्रॅम प्रोटिन्स, ५.२ ग्रॅम फॅट, १ ग्रॅम फायबर (तंतूमय पदार्थ) आणि ९.५. ग्रॅम लोह असते. मधुमेही रुग्णाने दररोज सकाळ व सायंकाळी ५0 ग्रॅम फुटाणे खाल्ले तर तीन दिवसात त्याच्या इन्सुलिनची मात्रा २0 टक्क्याने कमी होते.
  • कावीळ झाला असेल तर १०० ग्रॅम हरभर्‍याची डाळ दोन ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. त्यानंतर डाळ पाण्यातून काढून त्यामध्ये १०० ग्रॅम गूळ मिसळून ४-५ दिवस या मिश्रणाचे सेवन केल्यास कावीळ बरा होण्यास मदत होईल.
  • मातीच्या भांड्यामध्ये रात्री फुटाणे भिजवून ठेवा. सकाळी झोपेतून उठल्यानंतर भिजवलेले फुटाणे चावून-चावून खा. या उपायाने विर्‍यामध्ये वृद्धी होईल तसेच पुरुषाच्या कमजोरीशी संबंधित समस्या समाप्त होतील. भिजवलेले फुटाणे खाल्ल्यानंतर त्यावर दूध पिल्यास वीर्‍यातील पातळपणा दूर होईल.
  • गूळ आणि फुटाण्याचे नियमित सेवन केल्यास मुत्ररोगाशी संबधित समस्या समाप्त होतात. दररोज भाजलेले फुटाणे खाल्या मुळव्याधीचा त्रास कमी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

Big Discount: केंद्रानंतर 21 राज्यांनी केली घोषणा! जुनी कार स्क्रॅप करून नवीन कारवर मिळेल 50 हजारांची सूट

SCROLL FOR NEXT