Chicken Cheese Balls Esakal
फूड

Sunday Special Recipe: ट्राय करा, चिकन चीज बॉल्स

चिकन चीज बॉल्सची ही चविष्ट रेसिपी ट्राय करून पहा. 

सकाळ डिजिटल टीम

Non Veg Recipe: तुम्ही जर मांसाहारी असाल आणि संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी वेगळं आणि चविष्ट खाऊ इच्छित असाल तर चिकन चीज बॉल्सची ही चविष्ट रेसिपी ट्राय करून पहा. ही रेसिपी खायला इतकी रुचकर आहे की तुम्ही घरच्या पार्टीच्या स्नॅक मेनूमध्येही सामील करू शकता. या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे ही फार कमी वेळात तयार होते. चला तर  जाणून घेऊया ही टेस्टी स्नॅक रेसिपी चिकन चीज बॉल्स कसे तयार करायचे ?

साहित्य:

● एक पाव बोनलेस चिकन

● अर्धा कप चीज

● एक कप ब्रेडचे तुकडे

● एक बारीक चिरलेला कांदा

● एक अंडे

● हिरवी मिरची तुकडे

● लसूण पेस्ट

● अर्धा चमचा मिरी पावडर

● चवीनुसार मीठ

● एक चमचा चिली फ्लेक्स

● एक चमचा ओरेगॅनो

कृती:

चिकन चीज बॉल्स बनवण्यासाठी प्रथम एका बाऊलमध्ये बारीक केलेले चिकन घ्यावे, त्यात चिली फ्लेक्स, मीठ, ओरेगॅनो, लसूण, हिरवी मिरची आणि मिरी पावडर घालून सर्व गोष्टी नीट मिक्स करा.आता या मिश्रणाचे गोळे बनवा आणि त्याच्या मध्यभागी एक छिद्र करावे. छिद्राच्या मधोमध किसलेलं चीज भरून बॉल तयार करून घ्यावे.एका भांड्यात अंड्यात मीठ घालून चांगले फेटून घ्यावे. एका प्लेटमध्ये क्रम्ब्स पसरवा, मीठ घालून मिक्स करावे. ब्रेड क्रम्ब्समध्ये गोळे रोल केल्यानंतर, अंड्याच्या कोटमध्ये पुन्हा ब्रेड क्रंब्समध्ये बुडवून घ्या.कढईत तेल गरम करून हे गोळे कुरकुरीत सोनेरी तळून घ्यावे. तुमचे चविष्ट चिकन चीज बॉल्स तयार आहेत, तुमच्या आवडत्या डिपसोबत सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

तो आला आणि माझं आयुष्यच बदललं! रिंकू राजगुरूने दिली प्रेमाची कबुली; शेअर केला तिच्या रोमिओचा फोटो

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

SCROLL FOR NEXT