supriya khasnis recipe of tandul dal dhokla SAkal
फूड

तांदूळ-डाळ ढोकळा

ढोकळा पूर्ण गार झाल्यावर वड्या पाडाव्यात व त्यावर जिरे, मोहरी, हिंग इत्यादींची फोडणी घालावी. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चटणीबरोबर ढोकळा खाण्यास द्यावा.

सकाळ वृत्तसेवा

- सुप्रिया खासनीस

साहित्य : अर्धा वाटी तांदूळ, अर्धी वाटी मूग डाळ, दोन चमचे हरभरा डाळ, तीन लसूण पाकळ्या, दोन हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, काळ्या मिरीचे पाच ते सहा दाणे, एक चमचा तेल, दोन चमचे साखर, अर्धा चमचा सॅट्रिक ॲसिड, चवीनुसार मीठ, एक चिमूट हळद, एक चिमूट खाण्याचा सोडा, फोडणीचे साहित्य, कोथिंबीर, तेल.

कृती

प्रथम तांदूळ व डाळी पाण्यात तीन तास भिजत घालावे.

नंतर त्यातील पाणी काढून टाकावे व त्यात मिरच्या, लसूण पाकळ्या, आले, एक चमचा, तेल, दोन चमचे साखर, हळद, मीठ, व सॅट्रिक ॲसिड घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. वाटताना गरजेनुसार पाणी घालावे. तयार झालेले मिश्रण फेटावे. मिश्रण फार घट्ट असू नये. साधारण डाळ तांदूळच्या पाऊणपट पाणी लागते. नंतर एका बाजूला कुकरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवावे.

डब्याला तेलाचा हात लावावा.

तयार मिश्रणात सोडा व मिरे दाणे घालून एका बाजूने फेटावे व लगेच डब्यात ओतून सेट करून डबा कूकर मध्ये ठेवावा. शिट्टी काढून झाकण लावावे.

साधारण २०-२५ मिनिटांत ढोकळा तयार होतो.

ढोकळा पूर्ण गार झाल्यावर वड्या पाडाव्यात व त्यावर जिरे, मोहरी, हिंग इत्यादींची फोडणी घालावी. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चटणीबरोबर ढोकळा खाण्यास द्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tandulwadi Accident : इरफान बनला 'देवदूत'! चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत मारली उडी अन् चौघांचा वाचवला जीव; डोळ्यांदेखत गाडी 200 फुटांवरूनच...

Karad Accident: सुटीचा आनंद ठरला दुर्दैवी! गणपतीपुळ्याच्या प्रवासात तरुण अभियंत्याचा मृत्यू, कार ३०० फूट खड्ड्यात, तीन मित्र अन् मध्यरात्री काय घडलं..

FDA Decision: रुग्णांना दिलासा! रुग्णालयातीलच औषध दुकानातून खरेदीची सक्ती नाही; FDAचा मोठा निर्णय

म्युच्युअल फंड : फ्लेक्सी कॅप फंड : संपत्तीनिर्मितीचा उत्तम मार्ग

US-Iran Deal : जगासाठी दिलासा! अमेरिका-इराण तणाव १०७ दिवसांनी संपला, 'होर्मुझ' पुन्हा खुली होणार, ट्रम्प यांची शांती कराराची घोषणा

SCROLL FOR NEXT