Sweet Corn 
फूड

उकडलेले कणीस खाऊन कंटाळलाय तर स्वीट कॉर्नपासून बनवा 'या' तीन नव्या रेसिपीज

स्वीट कॉर्न पौष्टिक असून स्वीट कॉर्न दाणे हे चवीला गोड असतात

सकाळ डिजिटल टीम

ओला चिंब करणारा पाऊस आणि स्वीटकॉर्न हे कॉम्बिनेशन तर पावसाळ्यात प्रत्येकालाच अनुभवायला आवडते. धबधब्यावर भिजून झाल्यावर स्वीटकॉर्न खाल्ल्याशिवाय पावसाची मजा नाही. कुणाला भाजलेलं तर कुणाला मस्त वाफवलेले स्वीटकॉर्न आवडते. स्वीट कॉर्न पौष्टिक असून स्वीट कॉर्न दाणे हे चवीला गोड असतात. सध्या बाजारात स्वीट कॉर्न उपलब्ध आहेत. पण, केवळ उकडलेले किंवा भाजलेले कॉर्न खाऊन कंटाळा आला असेल तर त्यापासून वेगवेगळ्या रेसिपीज कशा बनवायच्या हे पाहुयात...

  • कॉर्न पकोडे

साहित्य

  • ३ कप स्विट कॉर्न दाणे

  • ३/४ -१ कप डाळीचे पीठ

  • १ टी स्पून जीरे पूड

  • हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे

  • मीठ चवी प्रमाणे

  • १ कप कोथिंबीर, बारीक चिरून

  • तळण्यासाठी तेल

कृती

  • मक्याचे दाणे आणि मिरच्या मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावे.

  • भांड्यात काढून घेवून त्यात जीरे पावडर घालावी.

  • साधारण १/४ कप अशा बेसन घालत मिक्स करावे.

  • चवीप्रमाणे मीठ घालावे. कढईत तेल गरम करावे.

  • पकोडे तळण्याआधी तयार पिठात १ चमचा गरम तेल घालावे.

  • हाताने तेलात पकोडे सोडून मंद आचेवर गोल्डन रंगावर तळावेत.

  • तिखट चटणी, सॉस बरोबर किंवा नुसतेही छान लागतात.

  • स्वीट कॉर्न भेळ

साहित्य

  • २ कप स्वीट कॉर्न दाणे

  • १/४ कप कोथंबीर

  • १ छोटा कांदा

  • २ हिरव्या मिरच्या

  • १ छोटा टोमॅटो

  • १ टी स्पून मिरे पावडर

  • १ टी स्पून चाट मसाला

  • १ छोटे लिंबू रस

  • १ टे स्पून बटर

  • मीठ चवीनुसार

कृती

  • मक्याचे दाणे उकडून घ्यावे.

  • कांदा, टोमॅटो, कोथंबीर बारीक चिरून घ्यावे.

  • एका कढई मध्ये बटर गरम करून कांदा व हिरवी मिरची परतून घ्यावी.

  • त्यामध्ये शिजवलेले मक्याचे दाणे, कोथंबीर, मीठ, लिंबू रस, मिरे पावडर, चाट मसाला, टोमॅटो घालून मिक्स करून घ्यावे. आणि गरम सर्व्ह करावे.

  • स्वीट कॉर्न टिक्की

साहित्य

  • २ कप वाफवलेले स्वीट कॉर्न

  • ४ ब्रेड स्लाइस

  • १ वाटी बेसन,

  • १ आल्याचा तुकडा

  • ४ हिरव्या मिरच्या

  • १ चमचा गरम मसाला

  • चवीनुसार मीठ

  • १ चमचा लिंबाचा रस

  • थोडी चिरलेली कोथिंबीर

  • थोडे दूध

  • थोड्या कांद्याच्या चकत्या

  • तळण्यासाठी तेल

कृती

  • ब्रेडच्या कडा काढून स्लाइस दुधात बुडवून लगदा करावा.

  • त्यामध्ये मक्याचे दाणे, बेसन, आले मिरची पेस्ट, मीठ, गरम मसाला, लिंबाचा रस, कोथिंबीर आदि साहित्य मिक्स करुन एकजीव करुन घ्यावे.

  • या मिश्रणाचा गोळा घेऊन हातावर पसरट टिक्की बनवून घ्यावी. तेल तापल्यावर मंद आचेवर सर्व टिक्क्या तळून घ्याव्यात. सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत गरमागरम टिक्की सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT