Mango Lassi esakal
फूड

Mango Lassi: मॅंगो लस्सीला मिळाला सर्वोत्तम भारतीय खाद्यपदार्थाचा दर्जा, पण सर्वात वाईट खाद्यपदार्थांची यादी वाचून व्हाल हैराण.!

Indian Mango Lassi Quality Ranks Top: दरवर्षीप्रमाणे यंदा ही 'टेस्ट ॲटलसने' सर्वोत्तम आणि सर्वात वाईट भारतीय खाद्यपदार्थांची यादी शेअर केली आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Mango Lassi : दरवर्षीप्रमाणे यंदा ही 'टेस्ट ॲटलसने' सर्वोत्तम आणि सर्वात वाईट भारतीय खाद्यपदार्थांची यादी शेअर केली आहे. टेस्ट ॲटलस हे खरे तर त्यांच्या सर्वोत्तम आणि सर्वात वाईट भारतीय खाद्यपदार्थांच्य यादीमुळे नेहमीच चर्चेत असते. परंतु, यंदा टेस्ट ॲटलसने सर्वात वाईट खाद्यपदार्थांच्या यादीत सर्वोत्तमपेक्षा वाईट भारतीय खाद्यपदार्थांचा अधिक समावेश केला आहे.

त्यामुळे, यावेळच्या यादीत सर्वोत्कृष्ट खाद्यपदार्थांपेक्षा निकृष्ट भारतीय खाद्यपदार्थांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका बाजूला हैदराबादी बिर्याणीने सर्वोत्कृष्ट खाद्यपदार्थांच्या यादीमध्ये पुनरागमन केले आहे तर दुसऱ्या बाजूला गेल्या वर्षीप्रमाणे यंदा ही वांग्याच्या भाजीचा सर्वात वाईट खाद्यपदार्थांच्या यादीत समावेश झाला आहे.

आज आपण टेस्ट ॲटलसच्या यादीत सर्वोत्तम भारतीय खाद्यपदार्थांमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारा पदार्थ कोणता आणि सर्वात वाईट खाद्यपदार्थ कोणते? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

सर्वोत्तम भारतीय खाद्यपदार्थ

सर्वोत्तम भारतीय खाद्यपदार्थांच्या यादीत मॅंगो लस्सी पहिल्या क्रमांकावर आहे. फळांचा राजा असलेल्या आंब्यापासून बनवल्या जाणाऱ्या या चवदार पदार्थाला सर्वोत्तम भारतीय खाद्यपदार्थाचा दर्जा देण्यात आला आहे. यापूर्वी टेस्ट ॲटलसने जगातील सर्वोत्तम मॅंगो डिशची यादी देखील प्रसिद्ध केली होती. या यादीत भारताच्या आमरसला पहिले स्थान मिळाले होते.

सर्वोत्तम भारतीय खाद्यपदार्थांच्या यादीत कोणाला मिळाले कोणते स्थान?

सर्वोत्तम भारतीय खाद्यपदार्थांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर मसाला चहाला स्थान देण्यात आले आहे. त्यानंतर, यादीतील तिसऱ्या स्थानावर बटर गार्लिक नानची वर्णी लागली आहे. अमृतसरी कुलचा चौथ्या स्थानी तर बटर चिकन पाचव्या स्थानी, हैदराबादी बिर्याणी सहाव्या स्थानी, शाही पनीर सातव्या स्थानी आणि छोले भटुरे सातव्या स्थानी आहे. या यादीत नवव्या स्थानावर तंदूरी चिकन आणि दहाव्या स्थानावर कोरमा आहे. विशेष म्हणजे यंदा बिर्याणीने सर्वोत्तम भारतीय खाद्यपदार्थांच्या यादीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

सर्वात वाईट भारतीय खाद्यपदार्थ

टेस्ट ॲटलसने जाहीर केलेल्या सर्वात वाईट भारतीय खाद्यपदार्थांमध्ये जलजीरा पहिल्या स्थानावर आहे. जे खरोखरच धक्कादायक आहे. कारण, अनेकांना उन्हापासून आराम मिळवण्यासाठी जलजीरा प्यायला आवडतो. त्यामुळे, निकृष्ट पदार्थांच्या यादीत त्याचा समावेश असणे हे धक्कादायक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT