Mango chia pudding recipe Esakal
फूड

आंब्यापासून तयार करा Mango chia milk, एक टेस्टी आणि हेल्दी पर्याय

तुम्ही नाश्त्यामध्ये Mango chia milkचा समावेश करू शकता. याची सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आम्ही आज शेअर करत आहोत

Kirti Wadkar

सध्या आंब्यांचा सिझन सुरु आहे. फळांचा राजा असलेला आंबा हा प्रत्येकाच्याच आवडीचा असतो. एकदा का बाजारात आंबे Mango विक्रिसाठी येऊ लागले की संपूर्ण उन्हाळा Summer आंब्यावर मनसोक्त ताव मारला जातो.

आंबे खाण्यासोबतच मग आंब्यापासून तयार करण्यात आलेले वेगवेगळे पदार्थ देखील चाखले जातात. Tasty recipe for summer Mango chia milk

कुणी आंब्याचा मिल्क शेक Mango Milk Shake पसंत करत, कुणी आईस्क्रिम, स्मूदी किंवा आमरस. वेगवेगळ्या प्रकारे आंब्याचा Mango आस्वाद घेतला जातो. आंब्याचा असाच एक छान पर्याय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तो म्हणजे मॅन्गो चिया मिल्क. आंब्याची ही डिश टेस्टी तर आहेत शिवाय हेल्दी देखील आहे. 

अलिकडे वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये चिया सिड्सचं मोठ्या प्रमाणात सेवन केलं जातं. खास करून नाश्तामध्ये चिया सिड्सचं Chia Seeds सेवन केल्यास यातील फायबरमुळे Fibre पोट भरलेलं राहतं परिणामी वजन वाढत नाही.

यासाठीच तुम्ही नाश्त्यामध्ये या Mango chia milkचा समावेश करू शकता. याची सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आम्ही आज शेअर करत आहोत. mango chia seed pudding

मॅन्गो चिया मिल्कसाठी लागणारं साहित्य

दोन पिकलेले आंबे, २ चमचे चिया सीड्स, दूध २ कप, साखर किंवा मध आवडीनुसार, सजावटीसाठी आवडीनुसार ड्रायफ्रूट्स

हे देखिल वाचा-

कृती-

  • एका वाडग्यामध्ये २ कप दूध घेऊन त्यात २ चमचे चिया सीड्स टाकून ३० मिनिटांसाठी झाकून ठेवावं.

  • तोवर एका आंब्याची साल काढून त्याचा गर काढून मॅश करून घ्यावा. किंवा मिस्करच्या मदतीने तुम्ही आमरस तयार करू शकता. 

  • तर दुसऱ्या आंब्याचे बारीक तुकडे करावे.

  • चिया सिड्स पूर्णपणे भिजल्यानंतर त्या जेलीप्रमाणे दिसतील आणि दूधाला घट्टपणा येईल. यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे २ चमचे साखर किंवा गूळ तसचं मध टाकू शकता. 

  • या दूधामध्ये आंब्याचा मिक्सरमध्ये तयार केलेला पल्प मिक्स करावा. 

  • आता सर्व्ह करण्यासाठी दोन काचेच्या ग्लामध्ये तळाला आंब्याचे काही बारीक केलेल तुकडे टाकावे. यावर चिया सीड्स, दूध आणि मॅन्गो पल्पचं तयार केलेलं मिश्रण ओतावं. 

  • वरून पुन्हा काही आंब्याचे बारीक तुकडे टाकावे तसचं ड्रायफ्रूट्से बारीक कापं टाकावे. 

  • ग्लास अर्धा तासासाठी फ्रिजमध्ये ठेवून चिया मॅन्गो मिल्क गार झाल्यानंतर तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता. 

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे तुम्ही एक डेझर्ट म्हणूनही तुमच्याकडे आलेल्या पाहुण्यांना किंवा कुटुंबियांना सर्व्ह करू शकता. घरातील लहान मोठे सगळ्यांनाच हे Mango chia milk नक्कीच पसंतीस पडेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT