Aloo Poha Tikki recipe:

 

Sakal

फूड

Teacher's Day 2025: मुलांच्या डब्यासाठी बनवा चवदार पोहा-बटाटा टिक्की, शिक्षकदिन बनेल खास

Aloo Poha Tikki recipe: दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवसाला खास बनवण्यासाठी मुलांच्या डब्यात पोहा-बटाटा टिक्की देऊ शकता.

Puja Bonkile

शिक्षक दिनाच्या निमित्ताने मुलांच्या डब्यासाठी पोहा-बटाटा टिक्की बनवण्याची सोपी आणि चवदार रेसिपी. या टिक्कीमध्ये पोहे, बटाटा, कोथिंबीर, आणि मसाले वापरून तयार केले जाते. शिक्षक दिनाच्या विशेष दिवशी मुलांना खास नाश्ता देण्यासाठी ही रेसिपी उत्तम पर्याय आहे.

Poha-Batata Tikki recipe for Teacher’s Day 2025: दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी केली जाते. या दिवशी विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांना शुभेच्छा देतात आणि त्यांचे आभार मानतात. या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवसाला खास बनवण्यासाठी तुम्ही मुलांच्या डब्यात पोहा-बटाटा टिक्की बनवून देऊ शकता. ही टिक्की बनवणे खुप सोपे असून चवदार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही टीक्की बनवू शकता.

बटाटा-पोहे टिक्की बनवण्यासाठी लागणारे साहित्य

पोहे

कोथिंबीर

तीळ

कोळे मीरं

जीरं

कस्तुरी मेथी

लाल तिखट

हळद

मीठ

गरम मसाला

उकडलेला बटाटा

बारिक चिरलेला कांदा

तेल

बटाटा-पोहे टिक्की बनवण्याची कृती

बटाटा पोहा टिक्की बनवण्यासाठी सर्वात आधी पोहे स्वच्छ धुवावे.

नंतर पाण्यात १० मिनिटे भिजत ठेवावे.

नंतर त्यातील पाणी काढून पोहे एका भांड्यात काढावे.

नंतर त्यात कोथिंबीर, तीळ, कोळे मीरं, जीरं, कस्तुरी मेथी, लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला, उकडलेला बटाटा किसून टाकावा.

नंतर त्यात बारिक चिरलेला कांदा टाका आणि चांगले मिक्स करावे.

नंतर हाताला तेल लावून गोलाकारात छोट्या टिक्की बनवा.

नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करावे आणि त्यात डिप फ्राय करून घ्यावे.

तुम्ही सकाळी नाश्त्यात आणि मुलांना डब्यात चवदार पदार्थ बनवून देऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni Retirement: "मी गांगुलीला तेव्हाच सांगितलेलं..." सचिन तेंडुलकरने धोनीबद्दलचा सांगितला जुना किस्सा; खास पोस्ट चर्चेत

IND vs NZ, 1st Test: बुम बुम बुमराह! तिसऱ्याच बॉलवर न्यूझीलंडच्या कर्णधाराला केलं क्लिन बोल्ड, दोन्ही ओपनर बाद; Video

अमेरिकेने इराणविरुद्धच्या युद्धात एक्स्पायर झालेली क्षेपणास्त्रे वापरली; सिनेट आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीसमोर सुनावणी

Truck Bike Accident : तेरवीहून परतताना पती-पत्नी ठार; शिंदोला मार्गावर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात

IND vs NZ, 1st Test: शुभमन गिलने टॉस जिंकला! सिराज-जडेजाला मात्र बाहेर बसवलं, कोणाला मिळाली Playing XI मध्ये संधी?

SCROLL FOR NEXT