Healhy Breakfast Recipie  esakal
फूड

Healhy Breakfast Recipie : सकाळच्या नाश्त्यामध्ये ट्राय करा, ‘हे’ हेल्दी आणि टेस्टी सॅंडवीच, दिवसभर राहील एनर्जी

Healhy Breakfast Recipie : सॅंडवीच हा एक अतिशय चविष्ट पदार्थ आहे. अनेकांना हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये खायला आवडतो.

Monika Lonkar –Kumbhar

Healhy Breakfast Recipie : सॅंडवीच हा एक अतिशय चविष्ट पदार्थ आहे. अनेकांना हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये खायला आवडतो. सॅंडवीचमध्ये विविध प्रकार पहायला मिळतात. कुणाला ग्रील केलेले तर कुणाला सोप्या पद्धतीने केलेले सॅंडवीच देखील आवडते.

बनवायला सोपा असलेला हा पदार्थ झटपट तयार देखील होतो. त्यामुळे, तर तो जगभरात प्रसिद्ध आहे. रोजच्या नाश्त्यामध्ये अनेक जण हा पदार्थ बनवतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने देखील आढळतात. आज आपण चवीला चविष्ट असणारे विविध प्रकारचे सॅंडविच कोणते? जे सकाळच्या नाश्त्यासाठी बेस्ट आहेत. ते जाणून घेणार आहोत.

टोमॅटो-काकडीचे सॅंडवीच

हे सॅंडवीच बनवण्यासाठी सर्वात आधी ब्रेडचे स्लाईस घ्या. या स्लाईसवर बटर लावा. त्यावर टोमॅटो, चिली सॉस किंवा शेझवान चटणी लावा. त्यावर आता कांदा, काकडीचे आणि टोमॅटोचे तुकडे ठेवा. त्यानंतर, दुसऱ्या ब्रेडवर बटर, मेयोनिज, ग्रीक योगर्ट आणि हवे असल्यास चीज लावा.

आता हे दोन्ही ब्रेड मिक्स करा. आता तुमचे टोमॅटो-काकडीचे सॅंडवीच तयार आहे. हे अतिशय चवदार आणि प्रथिनांनी युक्त असलेले सॅंडवीच आहे. तुम्ही या सॅंडवीचमध्ये विविध प्रकारच्या पालेभाज्यांचा ही समावेश करू शकता.

बटाट्याचे स्पेशल सॅंडवीच

भारतीय लोकांना हे सॅंडवीच खायला खूप आवडते. खास करून सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेत हे सॅंडवीच खायला अनेकांचे प्राधान्य असते. हे सॅंडवीच बनवण्यासाठी उकडलेले बटाटे घ्या, त्यात तेल, जिरे, लसूण, २-३ हिरव्या मिरच्या, आलं, मीठ आणि थोडे लाल तिखट घालून मिक्स करा. तुमचे सॅंडवीचसाठीचे सारण तयार आहे.

आता ब्रेडवर बटर, मेयोनिज आणि आवडीचा सॉस लावा. त्यावर आता बटाट्याचे सारण आणि कांद्याचे किंवा टोमॅटोचे काप ठेवा.आता दुसऱ्या ब्रेडवर बटर आणि मेयोनिज सॉस लावा. हे दोन्ही ब्रेड एकत्र करा आणि सॅंडवीच ग्रीलमध्ये हलके भाजून किंवा ग्रील करून घ्या. चविष्ट असे कुरकुरीत आणि हेल्दी बटाट्याचे सॅंडवीच तयार आहे. सकाळच्या नाश्तासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: सूर्यकुमार-शिवम दुबेही मुंबईसाठी खेळणार की नाही? महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Latest Marathi News Live Update : भारतातील अमेरिकन दूतावासाचे ट्विट व्हायरल

Bangladesh Hindu Youth Murder Reason : बांगलादेशातील हिंदू तरूणाच्या निर्घृण हत्येमागचे खरे कारण अखेर आले समोर!

Mumbai: राज्यात दोनच विमानतळांना प्रेरणादायी नावे, पण कोणत्या? अहवालातून महत्त्वाची माहिती समोर

Mumbai Water Supply: मुंबईत २२ ते २६ डिसेंबरपर्यंत पाणी संकट! 'या' भागांसाठी बीएमसीकडून महत्त्वाचा इशारा जारी, वाचा यादी...

SCROLL FOR NEXT