tips of sweet paneer burfi made by home in kolhapur 
फूड

पनीर आवडतं का तुम्हाला? सोप्या टिप्स वापरून तयार करा बर्फी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : होळीचा सण येताच प्रत्येकाच्या घरी नविन पदार्थ बनायला सुरुवात होते. या सणाला बाजारामध्ये विविध प्रकारच्या मिठाई मिळतात. पण यासोबत बाजारात भेसळीच्या मिठाई मिळायलाही सुरुवात होते. सामान्य माणसाला अशा मिठाईची माहिती करून घेणं कठीण होतं. अशामध्ये घरगुती मिठाई आरोग्य आणि स्वाद यांचा विचार करुन बनवता येतात. अशा मिठाई घरगुती पद्धतीने बनवल्या जाव्यात ही चांगली कल्पना असू शकते. मान्य आहे की, अशा मिठाई घरी तयार करणे थोडे कठीण आहे, परंतु थोडीशी मेहनत घेतली तर ते काम सोपे होऊन जाईल. आज आम्ही तुम्हाला घरीच पनीरची बर्फी बनवण्याच्या काही सोप्या टीप्स देणार आहोत. या मिठाईला तुम्ही बनवणार असाल आणि पाहुण्यांना खायला देणार असाल तर ते तुमच्या कुकिंगचे फॅन होऊन जातीलच. याशिवाय ते तुम्हाला ही मिठाई कशी बनवली हेही आवर्जून विचारतील. चला तर मग ही मिठाई कशी बनवतात ते पाहूयात..

साहित्य - 

  • 250 ग्राम पनीर
  • 1 कप मिल्‍क पाउडर
  • 1 चमचा पिस्‍ता
  • 1 चमचा ड्राई रोज पेटल्‍स
  • 1/2 छोटा चमचा वेलची पाउडर
  • साखर गरजेनुसार

कृती - 

सुरुवातीला घरी पनीर तयार करा. यासाठी फुल क्रीम दूध घ्या. आणि त्यामध्ये लिंबू पिळून ते दूध फोडून घ्या. तुम्ही पनीर बाजारतूनही खरेदी करू शकता. पनीर व्यवस्थित एकत्र करून घ्या. आता हे पनीर एका पॅनमध्ये टाकून मंद आचेवर शिजवून घ्या. वाटलेली साखर या पनीरमध्ये घाला आणि हे संपूर्ण मिश्रण शिजवून घ्या. यावेळी हे पनीर शिजवताना त्यामधून पाणी आणि तूप निघेल. ते पनीर तुपकट होत आले की त्यात मिल्क पावडर मिक्स करा. हे मिश्रण शिजवून घेउन त्यात इलायची पावडर मिक्स करा. आता हे पनीरचे मिश्रण सेट होण्यासाठी बेकिंग ट्रे मध्ये ठेवा. आणि ड्रायफ्रुट्स घालून ते गार्निशिंग करून घ्या. यानंतर तीस मिनिटांसाठी पनीरची बर्फी सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा आणि पाहुण्यांना खायला द्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

SCROLL FOR NEXT