Kairi-Dal 
फूड

आजची रेसिपी : कैरीची डाळ

सकाळवृत्तसेवा

साहित्य -
१ कैरी, १ वाटी हरभरा डाळ, २-३ हिरव्या मिरच्या (चवीप्रमाणे कमी-जास्त कराव्यात), मीठ चवीप्रमाणे. १ टी स्पून साखर, १/२ इंच आल्याचा तुकडा, फ़ोडणीपुरते तेल. 

फोडणीचे साहित्य -
हिंग, जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती -
हरभरा डाळ थंड पाण्यात कमीतकमी २ ते ३ तास भिजत घालावी. कैरीची साल काढून त्याचे तुकडे करावेत किंवा सरळ कैरी किसून घ्यावी. हिरव्या मिरचीचे मध्यम तुकडे करावेत, आल्याची साल काढून त्याचे पण तुकडे करावेत. कैरी, डाळ, मीठ, आले, मिरची एकत्र करुन मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावे. कैरी किसलेली असेल, तर मिक्सरमधे बारीक न करता तशीच डाळीमध्ये मिसळली तरी चालते. साखर घालून सगळे एकत्र नीट मिसळून घ्यावे. तेलाची हिंग, जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता घालून खमंग फोडणी करुन डाळीवर घालत डाळ परत एकदा नीट मिसळून घ्यावी. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

टीप -
ही डाळ नुस्तीच खायला दिली तरी चालते. विशेषतः बालगोपालांना ती खूप आवडते. जेवताना पानाच्या डाव्या बाजूला वाढायलादेखील ही डाळ उपयोगी पडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: कोट्यवधींची जमीन, आलिशान बंगला, फार्महाऊस… अशोक खरात १५ वर्षांत कसा बनला २०० कोटींचा मालक? कुंडली आली समोर

Bank Holiday: उद्या बँकांना सुट्टी? ईदमुळे 21 मार्चला तुमच्या शहरात बँका बंद की सुरू? पाहा RBI ची माहिती

'आमच्याकडे ‘जिन’ आहे, तो सर्व इच्छा पूर्ण करतो' म्हणत तरुणीची फसवणूक, अडीच वर्षांत १६ लाख रुपयांनी घातला गंडा

'ये तू इथून जा रे...' मराठी अभिनेत्यावर चांगलेच भडकलेले अशोकमामा आणि सचिन पिळगावकर, म्हणालेले...'याला इकडून हाकला रे…'

Maharashtra Kesari: उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट; माती-गादी विभागात अंतिम फेरीसाठी मल्ल सज्ज

SCROLL FOR NEXT