Puran-Poli
Puran-Poli 
फूड

आजची रेसिपी : पुरणाची पोळी

सकाळवृत्तसेवा

साहित्य - १ कप चणा डाळ, १ कप किसलेला गूळ, एक कप मैदा, १/२ कप गव्हाचे पीठ, ७ ते ८ टे. स्पून तेल, १ टी स्पून वेलची पूड, तांदळाचे पीठ.

कृती - १) कुकरमध्ये चणा डाळीच्या अडीचपट पाणी घालून चणा डाळ शिजवून घ्यावी. डाळ शिजली की, त्यातील पाणी निथळू द्यावे. हे पाणी वापरून कटाची आमटी करता येते.
२) डाळीतील पाणी निघून गेल्यावर ही डाळ पातेल्यात घ्यावी. त्यात किसलेला गूळ घालावा. मध्यम आचेवर हे मिश्रण आटवावे. आटवताना ढवळत वरचेवर राहावे. जर ढवळायचे थांबवले तर मिश्रण पातेल्याला लागून करपू शकते. या पुरणात चमचाभर वेलची पूड घालावी.
३) मिश्रण घट्टसर झाले की, पातेले गॅसवरून उतरवावे. मिश्रण पुरण यंत्रातून फिरवून घ्यावे.
४) मैदा आणि कणिक एकत्रित करून त्यात ५-६ चमचे तेल घालावे आणि सैलसर मळून घ्यावे. भिजवलेले पीठ २ तास मुरू द्यावे.
५) पुरणाचे दीड इंचाचे गोळे बनवून घ्यावे. मैद्याचा अर्धा ते एक इंचाचा गोळा घ्यावा आणि त्याची पातळसर पारी बनवून घ्यावी. त्यात पुरणाचा गोळा भरावा. सर्व बाजूंनी बंद करून घ्यावा.
६) पोळपाटावर थोडी तांदळाची पिठी घेउन हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी. तव्यावर खरपूस भाजून घ्यावी. साजूक तूप घालून गरम गरम सर्व्ह करावी. या पोळ्या टिकाऊ असतात. आठ एक दिवस सहज टिकतात. थंड पोळ्या दुधाबरोबर छान लागतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT