Dudhi Bhopla Kheer सकाळ डिजिटल टीम
फूड

Dudhi Bhopla Kheer : पावसाळ्यात पौष्टिक खायचं आहे? दुधी भोपळ्याची खीर ट्राय करा

पावसाळा सुरु झाला की गृहिणींना प्रश्न पडतो की घरातील सदस्यांनी पौष्टिक गोष्टी कशा खाऊ घालायव्यात?

सकाळ डिजिटल टीम

पावसाळा सुरु झाला की गृहिणींना प्रश्न पडतो की घरातील सदस्यांनी पौष्टिक गोष्टी कशा खाऊ घालायव्यात? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. चला तर मग आज बघूया नकोसा असलेला भोपाळा चविष्ट करुन खायचा कसा ते. चविष्ट प्रकारची दुधी भोपळ्याची खीर कशी तयार करायची? (Dudhi Bhopla Kheer)

दुधी भोपळ्याच्या खीरीसाठी लागणारे साहित्य:

1) अर्धा किलोचा दुधी भोपळा

2) एक लिटर कोरं दूध

3) एक चमचा तूप

4) एक ते दोन चमचा गव्हाचे भाजलेले पिठं

5) साखर (आपल्या आवडीनुसार)

6) काजू, बदाम, पिस्ते यांचे बारीक काप

7) वेलची पावडर

8) केशर

कृती :

  • सर्वप्रथम भोपळा स्वच्छ धूवून पुसून घ्यावा. नंतर भोपळा किसणीवर चांगला किसून बारीक करावा. पुढे भोपळ्याच्या किसाला १ ते २ चमचे भाजलेलं पिठ लावून त्याच्या प्रेशर कुकरमध्ये ३ शिट्ट्या काढून घ्याव्यात.

  • कुकर थंड झाल्यावर त्यातील वाफाळलेला भोपळयांचा किस काढून घ्यावा. तो किस पातेल्यात टाकून त्यात कोरं दूध घालून गॅसवर ठेवावा.

  • भोपळ्याचा किस घातलेल्या दुधाला चांगली उकळी आली की मग त्यात तुमच्या आवडीनुसार साखर घालावी. नंतर विलायची पावडर, केशर, काजू, बदाम व पिस्ते काप टाकावे.

  • (भोपळा जर लालसर असला तर मग केशर घालायची गरज नाही) खीरीला दुसरी उकळी येईपर्यंत चांगल ढवळत राहावं आणि खीर (Dudhi Bhopla Kheer)खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : नीटची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT