फूड

Ginger Halwa : हिवाळ्यात हेल्दी राहायचे असेल तर ट्राय करा आल्याचा हलवा; ही आहे सोपी रेसिपी

या हिवाळ्यात तुम्ही घरी ट्राय करु शकता आल्याचा पौष्टिक हलवा...

Aishwarya Musale

थंडीच्या वातावरणात मौसमी आजारांपासून बचाव करण्यासाठी लोक अनेक गोष्टी करतात. अनेक औषधांसोबतच आपण आपल्या आहारात उष्ण स्वभावाच्या गोष्टींचा समावेश करतो. थंडीत आजारांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी लोक अनेक उपाय करत असतात.

यामुळे या हिवाळ्यात तुम्हाला सर्व प्रकारच्या आजारांपासून स्वतःला वाचवायचे असेल आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल, तर आल्याचा हलवा नक्की खा. आले आणि गुळापासून बनवलेली ही रेसिपी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण मनसोक्त नक्की खातील. चला जाणून घेऊया याची रेसिपी...

आल्यापासून बनवलेला चहा (Tea) तुम्ही पिला असेलच पण आल्याचा हलवा ट्राय केला आहे का? नाही तर या हिवाळ्यात तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि सर्दी-खोकला यासारख्या आजारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आल्याचा हलवा नक्कीच मदत करेल.

आल्याचा हलवा बनवण्यासाठी साहित्य

किलो आले - 500 ग्रॅम

गूळ - 1 कप

बदाम - 1/२ कप

काजू - १/2 कप

मनुका - 20

तूप - 2 चमचे

अक्रोड - 1/4 कप

आल्याचा हलवा कसा बनवावा

सर्वप्रथम आले सोलून व्यवस्थित कापून जाडसर पेस्ट तयार करावी.

नंतर ग्राइंडरमध्ये काजू, अक्रोड आणि बदाम टाका आणि एक जाडसर मिश्रण तयार करावे.

आता एक पॅन घ्या आणि त्यात तूप टाकावे.

तूप गरम झाल्यावर त्यात आल्याचे मिश्रण घालून मिक्स करा.

हे मिश्रण सुमारे 15 मिनिटे ढवळत राहा.

आता त्यात गूळ घाला आणि चांगले मिक्स करावे.

यानंतर, त्यात मनुका आणि बारिक केलेला सुकामेवा घालावा आणि सुमारे 5 मिनिटं शिजवा.

आल्याचा हलवा तयार आहे, त्यावर ड्रायफ्रुट्स टाकून सजवा आणि सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andekar Gang: कशी सुरू झाली आंदेकर टोळीची दहशत? भांड्याचा व्यवसाय ते अंडरवर्ल्ड कनेक्शन! ४ पिढ्यांचा पडद्यामागचा काळा इतिहास

Mill Workers: गिरणी कामगार पुन्हा आक्रमक, हक्काच्या घरासाठी आंदोलन छेडणार

WhatsApp Services : नेट स्लो नाहीतर, व्हॉट्सअ‍ॅप डाऊन...! स्क्रोलिंग करताना अडचण येतीय? मग 'ही' ट्रीक वापरा

Latest Marathi News Updates:विसर्जन मिरवणुकीदरम्यान नाचण्यावरुन वाद, एका तरुणाचा खून

3D Photo Prompt : फ्रीमध्ये तुमचे '3D स्टाईल' (थ्री डी) फोटो बनवा, एका क्लिकवर..

SCROLL FOR NEXT