फूड

Food recipe : मटारचा हलवा खाल्लाय का कधी? एकदा नक्की करून पाहा, ही आहे रेसिपी

तुम्ही कधी मटारचा हलवा खाल्ला आहे का? नसेल तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा.

Aishwarya Musale

तुम्ही आजपर्यंत, गाजर हलवा, रवा हलवा, बटाट्याचा हलवा, मूग डाळ हलवा, खाल्ला असेल. पण तुम्ही कधी मटारचा हलवा खाल्ला आहे का? हिवाळ्यात मटारचा हलवा देखील ट्राय करू शकता आणि तुम्हाला त्याची चव खूप आवडेल.

मटारचा हलवा केवळ स्वादिष्टच नाही तर पौष्टिकतेनेही परिपूर्ण आहे. आज आम्ही तुम्हाला ते बनवण्याची पद्धत सांगणार आहोत. चला तर मग मटारचा हलवा कसा तयार करायचा ते जाणून घेऊया.

मटार हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

मटार हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम ३ वाट्या हिरवे मटार घ्या. यानंतर अर्धा लिटर दूध आणि अर्धा कप मावा घ्या. यानंतर 2 चमचे ड्रायफ्रुट्स, 1 टीस्पून पिस्ता, 1/2 टीस्पून वेलची पावडर, 1/2 चिमूट केशर, 3 टीस्पून देशी तूप, 3 टीस्पून नारळ पावडर आणि चवीनुसार साखर घ्या.

आता मटारचा हलवा बनवण्यासाठी प्रथम मटार घ्या आणि पाण्याने चांगले धुवा.

तसेच तुम्ही फ्रोझन मटारपासून हलवा बनवू शकता, परंतु ताज्या मटारपासून बनवलेला हलवा वेगळी चव देतो.

आता मटार मिक्सरमध्ये टाकून त्यात २-३ चमचे दूध घालून बारीक वाटून घ्या. लक्षात ठेवा मटारची पेस्ट बनवू नये.

यानंतर एका पातेल्यात दूध आणि मटारचे मिश्रण घालून मंद आचेवर भाजून घ्या.

१ मिनिट मटार भाजून घेतल्यावर त्यात देशी तूप घाला आणि ढवळत असताना मटारमधील पाणी सुकेपर्यंत शिजवा.

आता त्यात चिरलेला नारळ, ड्राय फ्रुट्स (काजू, पिस्ता, बदाम, मखणा, मनुका, अक्रोड) घालून दूध घाला.

हलवा थोडा वेळ शिजवल्यानंतर त्यात चवीनुसार मावा व साखर घालून मिक्स करावे.

नंतर हलव्यात केशर आणि वेलची पूड घाला आणि ढवळत असताना शिजवा.

हलव्याला वास येऊ लागला आणि पूर्ण शिजला की गॅस बंद करा.

यानंतर, तुमचा चवदार मटार हलवा तयार आहे, त्याला ड्रायफ्रुट्सने सजवा आणि सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT