dahi wada sakal
फूड

Dahi Vada: असा बनवाल टेस्टी दहीवडा तर बोट चाखत रहाल; जाणून घ्या रेसिपी

दही वडा हे उत्तर भारतातील अतिशय लोकप्रिय असे स्ट्रेट फूड आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Food Recipe: दही वडा हे उत्तर भारतातील अतिशय लोकप्रिय असे स्ट्रेट फूड आहेत. अनेकदा आपण वेगवेगळ्या कार्यक्रमात याचा आस्वाद घेता येतो. दही वडा खास प्रसंगी आणि उत्सवांसाठी बनविला जातो. पण आज आपण घरच्याघरी दही वडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. (dahi vada recipe in marathi)

साहित्य

  • २ वाट्या उडीद डाळ

  • ५ वाट्या गोड दही

  • साखर, मीठ

  • आले एक ते दीड इंच

  • हिरव्या मिरच्या २

  • बारीक चिरून पाव वाटी कोथिंबीर

  • तळणीसाठी तेल

रेसिपी कृती

प्रथम वडे करण्याआधी चार तास डाळ भिजत घाला. नंतर मिक्सरवर पाणी घालून वाटा.

मिश्रण सैल झाले तर वडे तेल खातात. (वरून तळलेले व आतून कच्चे असेही होतात). वाटलेल्या डाळीत चवीपुरते म्हणजे साधारण एक चमचा मीठ घाला.

कढईत तेल तापत ठेवा. तेल प्रथम चांगले तापू द्या. नंतर हाताने छोटे छोटे वडे तळा.

एका वेळेस साधारण पाच-सहा वडे तळून होईल इतपत तेल घ्या. म्हणजे तळणीचे तेल फार शिल्लक राहत नाही.

उरलेले तेल भाजी-आमटीच्या फोडणीसाठी वापरून टाका.

वड्याचा एक भाग तळून झाला की, पाण्यात टाका. दुसरे वडे तळून झाले की, पहिले वडे पाण्यातून काढून हाताने दाबा व बाजूला ठेवा. असे सर्व वडे तयार करून घ्या.

दही वडासाठी दही कशी बनवायची

  • पाणी न घालता दही रवीने घुसळा. त्यात चवीप्रमाणे साखर, मीठ व आले, मिरच्या वाटून घाला. कोथिंबीर चिरून टाका.

  • वडे खावयास देण्याआधी अर्धा तास दह्यात घाला. डिशमध्ये देताना दही वड्यावर थोडेसे लाल तिखट, मिऱ्याची पूड व चिचेची गोडसर चटणी घाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT