दडपे पोहे सकाळ
फूड

झटपट नाश्ता बनवायचा? ट्राय करा दडपे पोहे, वाचा सोपी रेसिपी

आज आपण दडपे पोहे कसे बनवायचे, यासंदर्भात जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

आपल्या सकाळच्या नाश्तामध्ये पोहे हा प्रकार खूप साधारण आहे. आपण अनेकजण सकाळच्या नाश्त्यात पोहे खात असतो. पण तुम्ही दडपे पोहे विषयी ऐकलं का. मुळात हे दडपे पोहे प्रामुख्याने कर्नाटक येथे बनवले जाते. हे खुप टेस्टी आणि बनवायला खुप सोपी असतात आज आपण दडपे पोहे कसे बनवायचे, यासंदर्भात जाणून घेणार आहोत.

साहित्य –

  • पाव किलो पातळ पोहे

  • २ कांदे बारीक चिरा

  • २ काकड्या बारीक चिरा

  • ४-५ हिरव्या मिरच्या बारीक चिरा

  • मूठभर कोथिंबीर बारीक चिरा

  • अर्धी वाटी दाण्याचं कूट

  • अर्धी वाटी खोवलेलं ओलं खोबरं

  • १-२ टीस्पून साखर

  • अर्ध्या लिंबाचा रस

  • मीठ चवीनुसार

  • १-२ टेबलस्पून तेल

  • थोडी मोहरी

  • पाव टीस्पून हिंग

कृती –

१) पोहे कढईत मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर बाजुला काढून ठेवा.

२) पोहे थंड झाले की त्यावर कांदा, काकडी, कोथिंबीर, साखर, मीठ, दाण्याचं कूट. ओलं खोबरं घाला.

३) एका लहान कढईत तेल गरम करा. तेल चांगलं तापलं की त्यात मोहरी घाला.

४)यानंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून ती चांगली परतून घ्या.

५) आता त्यात हिंग घाला आणि गॅस बंद करा. ही फोडणी पोह्यांवर ओता.

६) सगळं नीट एकत्र करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT