Cucumber Recipies esakal
फूड

Cucumber Recipies : हेल्दी अन् टेस्टी.! कडक उन्हाळ्यात शरीराला गारवा देणाऱ्या काकडीच्या सोप्या रेसिपीज

Cucumber Recipies : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी आपण विविध घटकांचा आहारात समावेश करतो.

Monika Lonkar –Kumbhar

Cucumber Recipies : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी आपण विविध घटकांचा आहारात समावेश करतो. हिरव्या पालेभाज्यांसोबतच गाजर, काकडी, कैरी, बीट यांचा ही समावेश आपण आहारात आवर्जून करतो. उन्हाळ्यात खास करून काकडी खाल्ली जाते. काकडीमुळे शरीराला थंडावा मिळतो. कारण, काकडीमध्ये पाण्याचे भरपूर प्रमाण आढळून येते.

अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध असलेल्या काकडीपासून विविध प्रकारचे सॅलेड बनवले जातात. काकडीमध्ये असलेल्या फायबरमुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. परंतु, काकडीपासून केवळ सॅलेडच बनवले जातात असे नाही तर उन्हाळ्यात काकडीपासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ देखील बनवले जातात. आज आपण काकडीपासून बनवल्या जाणाऱ्या काही सोप्या रेसिपीज जाणून घेणार आहोत.

काकडीचा रायता किंवा कोशिंबीर

काकडीचा रायता किंवा कोशिंबीर हा प्रकार बहुधा सगळ्यांनाच माहित असेल. हा पदार्थ बनवायला फार साहित्याची गरज पडत नाही. काकडीचा रायता बनवण्यासाठी तुम्हाला ताजे दही, शेंगदाण्यांचा कुट, जिरा पावडर, काळे मीठ किंवा साधे मीठ आणि हिरव्या मिरचीची पेस्ट लागेल.

सर्वात आधी दही चांगले फेटून घ्या. आता या दह्यामध्ये किसलेली काकडी, जिरा पावडर, शेंगदाण्यांचा कुट, काळे मीठ किंवा साधे मीठ आणि हिरव्या मिरचीची पेस्ट मिसळा. तुमची काकडीची कोशिंबीर किंवा काकडीचा रायता एकदम तयार आहे. जेवणासोबत ही कोशिंबीर खाल्ल्याने जेवणाची चव आणखी वाढते. शिवाय, आपले शरीर थंड राहण्यास मदत होते.

काकडी-पुदिन्याचा ज्यूस

काकडी आणि पुदिन्याचा ज्यूस बनवायला अतिशय सोपा आहे. हा ज्यूस बनवण्यासाठी सर्वात आधी काकडीचे बारीक तुकडे करून घ्या. त्यानंतर, बारीक चिरलेल्या काकडीमध्ये मध, आलं, पुदिन्याची पाने, लिंबाचा रस मिसळा. आता यामध्ये बर्फाचे तुकडे घालून मिक्सरला बारीक वाटून घ्या. तुमचा काकडी-पुदिन्याचा ज्यूस तयार आहे. आता एका ग्लासमध्ये हा ज्यूस काढून घ्या. उन्हाळ्यामध्ये फ्रेश राहण्यासाठी हा ज्यूस उत्तम पर्याय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT