Healthy Juice 
फूड

Healthy Juice: बदल हवा, मग सरबत करूया

Healthy Juice: कधीकधी काहीतरी जिभेला वेगळ्या चवी लागतात. जिभेचे चोचले पुरवणे हे सोपे काम नव्हेच

सकाळ वृत्तसेवा

Healthy Juice: कधीकधी काहीतरी जिभेला वेगळ्या चवी लागतात. जिभेचे चोचले पुरवणे हे सोपे काम नव्हेच. म्हणूनच जरा बदल हवा असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे सरबत हवे. जरा नियोजन कराल तर घरी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यातून चविष्ट सरबत तयार करता येतात. मग आम्ही खास तुमच्यासाठी संकलित केलेल्या ही सरबते एकदा नक्की करून बघा.

लिंबू सरबत 

जास्त पिवळे नाही किंवा जास्त हिरवे नाही असे चार लिंबू धुवून घ्या. लिंबाचे अर्धे अर्धे काप करा व बिया काढून घ्या. मिक्सरमध्ये लिंबाचे काप सालीसकट टाका. अख्खी खडीसाखर (बारीक केलेली किंवा कुटलेली), थोडे मध, काळे मीठ, क्रश केलेली पुदिन्याची पाने व आवडत असल्यास थोडा चाट मसाला टाका. खडीसाखर पोटासाठी थंड असते म्हणून ती आर्जवून वापरा. यात क्रश केलेला बर्फ, पाणी टाकून मिक्सरमधून फिरवा. गरजेनुसार पाणी घाला. सर्व्ह करताना ग्लासमध्ये खाली गुलाबजल किंवा गुलाबाच्या पाकळ्या घाला. लाल, पिवळे, हिरव्या रंगाचे डाएट लिंबू सरबत सर्व्ह करा.

बेलफळाचे सरबत

पिवळे बेलफळ घ्या. फळ चिरून गर वेगळा काढा. एका भांड्यात पाणी व गर घालून पाच मिनिटे उकळू द्या. मिश्रण जरा थंड होऊ द्या. आता मिक्सरमध्ये बेलफळाचा हा उकळून घेतलेला गर, खडीसाखर, मध, चमचाभर लिंबू रस, काळे मीठ, किंचित पुदिन्याची पाने घालून एकदा फिरवा. अगदीच बारीक नको किंवा खोल पातेल्यात हे मिश्रण घेऊन रवीने घोटले तरी चालते. मिश्रणात बर्फ क्रश करून टाका. सरबत तयार.

टरबूज सरबत

टरबूज चिरून लाल भागाचे काप करा व बिया काढून टाका. मिक्सरमध्ये टरबुजाचे काप, अगदी थोडा लिंबाचा रस, मध, पुदिन्याची पान, काळे मीठ, दालचिनी पावडर टाकून फिरवून घ्या. या सरबतामध्ये साखर टाकण्याची गरज नाही.

शाही लिंबू पाणी

पाण्यात लिंबाचा रस, साखर, मीठ, विलायची पावडर, चंदन पावडर व गरम पाण्यात भिजवलेला केशर घाला. शाही लिंबू पाणी तयार.

आंब्याचे सरबत

आंब्याचा गर काढा. मिक्सरमध्ये गर, मध, लिंबाचा रस, जलजिरा, पुदिन्याची पाने क्रश करून टाका. बर्फ क्रश करून टाका व मिक्सरमधून फिरवून घ्या. गरजेनुसार पाणी घाला. सरबत तयार. जास्त गोड हवे असल्यास खडीसाखर घाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC : एमपीएससीच्या मुलाखती पुढे ढकलल्या; पात्र उमेदवारांवर मोठा अन्याय

Traffic Challan: कारमध्ये गाणं वाजवलं तर लागणार मोठा दंड, गाडी जप्तही होऊ शकते; काय आहे नियम?

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

Vishwa Shanti Yatra : आंतरिक शांतीतून विश्वशांती; अभूतपूर्व 'विश्व शांती यात्रा २०२६'चे आयोजन

Apple Layoffs: दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात; Fitness+ मधील ‘या’ टीमवरही आता गदा

SCROLL FOR NEXT