Healthy Breakfast Recipe  esakal
फूड

Healthy Breakfast Recipe : नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक गाजर चीज टोस्ट, ट्राय करा ‘ही’ सोपी रेसिपी

गाजरामध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटक आढळून येतात. त्यामुळे, गाजर आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Healthy Breakfast Recipe : गाजराचे नाव घेतले की, अनेकांना फक्त गाजराचा हलवाच आठवतो. मात्र, असे अजिबात नाही. गाजरापासून फक्त गाजराचा हलवाच नाही तर अनेक प्रकारच्या डिशेस बनवल्या जातात.

गाजरामध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटक आढळून येतात. त्यामुळे, गाजर आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. हिवाळ्यात गाजराचा तुमच्या आहारात जरूर समावेश करायला हवा. त्यासाठी आज आम्ही गाजरापासून बनवली जाणारी खास ब्रेकफास्ट रेसिपी घेऊन आलो आहोत.

या ब्रेकफास्ट रेसिपीचे नाव आहे गाजर चीज टोस्ट. सकाळच्या नाश्त्यामध्ये झटपट बनवली जाणारी ही रेसिपी एकदम सोपी आहे. चला तर मग जाणून घेऊयात या रेसिपीबद्दल.

गाजर चीज टोस्टसाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे

  • किसलेले गाजर

  • ब्रेडचे स्लाईस

  • चीज (तुमच्या आवडीनुसार)

  • कांदा १

  • टोमॅटो १

  • ऑलिव्ह ऑईल

  • मीठ

  • काळी मिरी

गाजर चीज टोस्ट या पद्धतीने बनवा

  • सर्वात आधी गाजर किसून घ्या किंवा त्याचे लहान तुकडे करून घ्या. त्यानंतर, एक पॅन घ्या.

  • या पॅनमध्ये थोडे ऑलिव्ह ऑईल घालून तेल गरम करून घ्या. त्यानंतर, त्यात गाजर आणि चिरलेला कांदा आणि टोमॅटो घाला.

  • आता पॅनमधील गाजर मऊ होईपर्यंत ते शिजवा. त्यानंतर, ब्रेडचे स्लाईस घेऊन त्यावर गाजर, कांदा आणि टोमॅटो चीजसारखे पसरून घ्या.

  • त्यानंतर, २०० डिग्री सेल्सिअस तापमानात प्री-हीटेड ओव्हनमध्ये सुमारे १० मिनिटे हे ब्रेड स्लाईस बेक करून घ्या.

  • हे ब्रेड पूर्णपणे टोस्ट झाल्यानंतर छान प्लेटमध्ये सजवा आणि त्यावर ओरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि तुमच्या आवडीप्रमाणे काळी मिरी, चीज घाला.

  • आता तुमचे पौष्टिक गाजराचे चीज टोस्ट तयार आहे.

  • हे पौस्टिक गाजराचे चीज टोस्ट तुम्ही सर्व्ह करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinayak Raut : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय राऊतांकडून सुनेचा छळ?, ठाण्यात गुन्हा दाखल; नगरसेवक पतीवर गंभीर आरोप

IND vs ENG, Rankings: भारताचं १६०० दिवसांचं राज्य संपलं! इंग्लंडने मालिका विजयासह टी२० मधील नंबर १ चा ताजही हिसकावला

Shalarth ID Scam : शिक्षकांची फसवणूक करणारा रिपाइं शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजाआड; 'शालार्थ' घोटाळ्यात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, न्यायालयात 11 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर

Devendra Fadnavis: इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास; बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई

Latest Marathi News Update : पुणेकरांना दिलासा! पुण्यात तूर्त पाणीकपात नाही,पुढील आठवड्यात निर्णय

SCROLL FOR NEXT