vanilla cake recipe homemade tips food marathi news 
फूड

केक बनवायला शिकताय, तर या टिप्ससह घरच्या घरी बनवा सोप्या पध्दतीने व्हॅनिला स्पंज केक

अर्चना बनगे

कोल्हापूर : केक हा प्रत्येक घरातील आवडता पदार्थ झाला आहे.  अलीकडच्या काळात केकमध्ये नवनवीन स्वाद आले आहेत. आपण प्रत्येक जण घरामध्ये केक बनवण्यासाठी उत्सुक असतो, परंतु अनेक वेळा हे आपल्याला शक्य होत नाही. जेव्हा आपण पहिल्यांदा केक बनवण्यासाठी तयारी करतो त्यावेळी आपल्याला ही प्रक्रिया अत्यंत किचकट अशी वाट लागते.

तुम्हाला या ठिकाणी स्पंज केक बनवण्यासाठी आम्ही रेसिपी घेऊन आलो आहोत. हे एक अत्यंत स्वादिष्ट स्पंजी व्हॅनिला केक रेसिपी आहे जे खुसखुशीत आणि चवदार ठरू शकते.
ही रेसिपी फूड ब्लॉगर अल्पा मोदी यांनी त्यांच्या युट्यूब चॅनल 'समथिंग कुकिंग विथ अल्पा' वर शेअर केली होती.

व्हॅनिला स्पंजी केक तयार करण्यासाठी खालील प्रकारे  कृती करा.

1) एका छोट्या बाऊल  मध्ये लोणी घ्या आणि त्याला पाच मिनिट चांगल्या पद्धतीने फेटाळून घ्या जेणेकरून त्याचा रंग पांढरा होईल.

2) साखर बारीक करून घ्या आणि ते चांगल्या पद्धतीने त्यामध्ये मिसळून घ्या 

3) एकूण तीन अंडी घ्या आणि त्यातील एक एक अंडे फोडून  ते फेटाळून घ्या.

4) हे सर्व मिश्रण अत्यंत योग्य पद्धतीने मिक्सिंग होईपर्यंत त्याला हलवत रहा. त्यानंतर त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स टाका आणि अर्धा मिनिट पुन्हा ते फेटाळून घ्या.

5) आता मैदा आणि बेकिंग पावडर दोन्ही एकामध्ये मिक्स करा व ते एका बाऊल मध्ये घाला.

6) आता मैदा हळूहळू अंडी आणि लोणी मिक्स केलेल्या बाऊलमध्ये हळू हळू घाला. त्यानंतर सामान्य तापमानात दुध मिक्स करा.

7) आता बेकिंग ट्रे गुळगुळीत करा यासाठी बटर पेपरचा उपयोग करा. कडेने थोडासा मैदा भुरभुरून घ्या.  त्यानंतर बेकिंग ट्रे उलटा करा यामुळे जादा झालेला मैदा निघून जाईल.

8) त्यानंतर तयार झालेले मिश्रण ट्रेमध्ये  एकसारखे पसरून घ्या. एका काडीच्या सहाय्याने या मिश्रणावर रेषा ही ओढा. 

9)  त्यानंतर आता ओव्हन मध्ये 40 ते 45 मिनिटे हा केक ठेवा.
तुम्हाला अत्यंत स्वादिष्ट असा स्पंज व्हॅनिला केक खाण्यासाठी तयार होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT